💥पाथरी येथे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वच्छता अभियान संपन्न....!


💥कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली💥

पाथरी:-येथील स्व. नितीन महाविद्यालयात आजादी का अमृत महोत्सव विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी साजरा करण्यात आला याचाच एक भाग म्हणून राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वच्छता अभियान यशस्वीरीत्या राबविले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.

 यावेळी विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. राम फुन्ने , प्रा. डॉ. अर्चना बदने,प्रा. डॉ. बोचरे जे. एम. डॉ. सुरेश सामाले आणि प्राध्यापक तुळशीदास काळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सुरेश सामाले यांनी केले यात त्यांनी आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाची रूपरेषा आणि त्याचे महत्व विशद केले तर अध्यक्षीय समारोपा मध्ये प्राचार्य डॉ राम फुन्ने यांनी श्रम संस्काराचे महत्त्व तसेच संत गाडगेबाबा यांचे आदर्शवत जीवन उदाहरणांसह पुढे ठेवले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.काळे तुळशीदास यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर साहेब राठोड यांनी मानले यावेळी कार्यक्रमाला बहुसंख्य प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित राहून स्वच्छता अभियानात सक्रीय सहभाग नोंदविला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या