💥मंगरूळपीर येथे राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत १९ लाभार्थींना धनादेशाचे वाटप...!


💥आमदार लखन मलिक यांच्या अध्यक्षतेखाली तर तहसिलदार कोंडागुरले यांच्या उपस्थितीत करण्यात आले वाटप💥

फुलचंद भगत 

वाशिम:-मंगरूळपीर तहसिल अंतर्गत कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील १९ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयाचा धनादेश वितरण स्थानिक तहसिल कार्यालय सभागृहात दिनांक ३१ डिसेंबर रोजी आमदार लखन मलिक यांच्या अध्यक्षतेखाली तर तहसिलदार नरसैया कोंडागुरले,नायब तहसिलदार रवि राठोड यांच्या प्रमुख ऊपस्थीतीत करण्यात आले. 

              राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत १३ लाभार्थींना धनादेशाचे वाटप तर ६ लाभार्थ्याचेही अनुदानाचे चेक तयार आहेत.तहसिल कार्यालय मंगरुळपीर कडुन सदर चेक वितरीत करण्यात आले आहे.कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील एकुन १९ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयाचा धनादेश वितरण स्थानिक तहसिल कार्यालय सभागृहात ३१ डिसेंबर २०२१ रोजी करण्यात आले. दारिद्रय रेषेखालील वयाच्या १८ ते ६० वर्षे आतील कुटुंब प्रमुखाचा आकस्मिक मृत्यु झाल्यास अशा कुटुंब प्रमुखाच्या विधवा पत्नीस २० हजाराचा लाभ देण्यात येतो. या आर्थिक वर्षात १९ महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला. यावेळी आमदार लखन मलिक यांच्यासह तहसीलदार नरसैया कोंडागुरले,नायब तहसिलदार रवि राठोड,सुरेशभाऊ लुंगे,जि.प.सदस्य मोहन चौधरी,दिलीपसिंह रघूवंशी,विनोद मगर,मा.जि.प.सदस्य नितेश मलिक,पंस.सदस्य अतुल गायकवाड,विलास गायकवाड,योगेश देशपांडे,निलेश जयस्वाल, संजय  गांधी निराधार समिती सदस्य ऊपस्थित होते. कुटुंबातील कर्त्या पुरुषावर त्या कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी असते. परंतु नियतीच्या आड एखादी अनुचित घटना घडून अशा कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यास, शासन अर्थसहाय्य योजनेंतर्गत मदत करते. अर्थसहाय्य योजनेंतर्गत मंगरुळपीर तालुक्यातील एकूण १९ कुटुंबांना प्रत्येकी २० हजार रुपयांचा धनादेश आमदार मलिक यांच्या हस्ते वाटप करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी विचार व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील सर्व ग्रा तलाठी, संबंधित अधिकारी, सरपंच, उपसरपंच, रोजगार सेवक व लाभार्थ्यांसह नागरिक ऊपस्थीत होते.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या