💥निम्न दुधना प्रकल्पातील कालव्याची दुरुस्ती करुन अर्थवट राहिलेले मुख्य कालवा व मायनरची कामे तात्काळ सुरू करा...!


💥अन्यथा कार्यालयास टाळा ठोकण्याचा प्रहार जनशक्ती पक्षाचा इशारा💥

परभणी - परभणी तालुक्यातून जाणाऱ्या निम्न दुधना कालव्याची व मायनरची कामे अर्धवट राहिली असून कंत्राटदाराने काम सोडून दिल्याने संबंधीत काम ३ ते ४ वर्षापासून कामे प्रलंबित आहे. परभणी तालुक्यातील झरी, मिर्झापूर, साडेगाव, सावंगी ( खु. ) व बोबडे टाकळी या भागातून जाणारा निम्न दुधना कालवा पुढे पिगळीकडे जातो. परंतु ३ ते ४ वर्षापासून कामे प्रलंबित असल्याने मुख्य कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ व झाडे वाढलेली आहेत.


त्या शिवाय मुख्य कालवा व या कालव्यावरील मायनरची ( चारी ) कामे सुरु झालेली नाहीत. निम्न दुधना प्रकल्पामध्ये मुबलक प्रमाणात पाणी असून देखील शेतकन्यांना मात्र कालव्याची व मायनरची कामे अर्धवट राहिल्याने व काही ठिकाणी सुरु न झाल्याने या सिंचनासाठी या पाण्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे परिसरातील शेतकारी सिंचनापासून वंचित राहत आहेत. या बाबत या परिसरातील अनेक शेतकन्यांनी प्रहार जनशक्ती पक्ष परभणी कडे लेखी स्वरुपात तक्रार करून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देणे व याबाबत न्याय मिळून देण्याची विनंती केली आहे निम्न दुधना मुख्य कालव्याची प्रलंबित कामे, कालव्यातील गाळ कालव्यात व बाजूने उगवलेली झाडे काढावी तसेच मंजूर असणान्या मुख्य कालव्याला जोडणाच्या मध्यम व लघु मायनर ( चारी ) चे सुरु न झालेली व अर्धवट राहिलेली कामे तात्काळ सुरु करावी व यासाठी तात्काळ नवीन एजन्सी नेमुन त्यामार्फत कामे करून या परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कार्यकारी अभियंता, माजलगाव कालवा, परभणी यांना भेटून एका निवेदनाद्वारे केली आहे. या बाबत तात्काळ म्हणजे १५ दिवसात कामाला सुरुवात न केल्यास नाईलाजास्तव प्रहार जनशक्ती पक्षाला विभागा विरुध्द मोठे जनआंदोलन उभे करून कार्यालयास टाळे ठोकले जाईल व त्यावेळी उदभवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत आपले कार्यालय स्वतः जबाबदार असा इशारा या वेळी देण्यात आला.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, ज्ञानेश्वर पंढरकर, बाळासाहेब तरवते, रामेश्वर जाधव, नकुल होगे, शाम भोंग, दत्तराव रवंदळे, ज्ञानदेव पुंजारे, धर्मेंद्र तूपसमुंद्रे, वैभव संघई इत्यादीच्या सह्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या