परभणी जिल्ह्यातील हिदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत कट्टर हिंदुत्ववादी अस्सल वाघ काळाच्या पडद्या आड...!

 


💥हृदयविकाराने निधन झालेल्या मा.शहरप्रमुख शशिकांत खन्नांच्या वाट्याला पक्षाने दिली अखेर ४८ गुन्ह्यांची शिदोरी💥


 
परभणी ; परभणी येथील शिवसेनेचे माजी शहरप्रमुख शशिकांत खन्ना यांचे आज गुरूवार दि.२३ डिसेंबर २०२१ रोजी मध्यरात्री ०३-०० वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले.


हिंदुहृदय सम्राट स्व.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक शिवसैनिक म्हणून संपूर्ण जिल्ह्याला परिचित असलेले शशिकांत खन्ना यांनी जिल्ह्यात शिवसेनेच्या स्थापणेपासूनच शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग नोदवून शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पक्षवाढीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत स्वतःचे संपूर्ण आयुष्य शिवसेनेसाठी खर्च केले सन २००१ साली त्यांना तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर लंगोटे यांनी उपशहर पदाची जवाबदारी सोपवली होती पक्षाने जनहितार्थ केलेल्या अनेक आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवलेल्या शशिकांत खन्ना यांच्यावर तब्बल ४८ गुन्ह्यांची नोंद झाली होती त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर सन २००७ यावर्षी शहरप्रमुख पदाची जवाबदारी सोपवली परंतु पक्षाच्या वतीने आयोजित विविध आंदोलन व कार्यक्रमांसाठी आर्थिक तरतूद करण्याची क्षमता नसल्यामुळे स्वाभिमानी शिवसैनिक असलेल्या शशिकांत खन्ना यांना तत्कालीन संपर्क प्रमुख रविद्र मिर्लेकर यांच्या आदेशावरून शहर प्रमुख पदाचा राजीनामा द्यावा लागला 

अनेक गुन्ह्यांची नोंद असलेल्या खन्ना यांच्यावर अखेर विविध समस्यांना समोरे जावे लागत असतांना हृदयविकाराच्या तिव्र झटक्यामुळे जगाचा निरोप घेण्याची वेळ आली जिल्ह्यात शिवसेना पक्षांच्या वाढीसाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावणाऱ्या अनेक शिवसैनिकांच्या गळ्यात शेवटी गुन्ह्यांची माळ घालून पक्षाने त्यांना एकाकी पाडल्यामुळे पक्षासाठी जिवावर उध्दार होऊन वाटेल ते करण्याची हिंमत असलेले हिंदुहृदय सम्राट स्व.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या शिवसैनिकांची जमात पाहता पाहता संपुष्टात येवून पक्षाच्या नावावर स्वतःच्या दुष्कृत्यांवर पांघरूण घालणारे व अनैतिक व्यवहाराचे साम्राज्य निर्माण करणारे पोटभरू पक्षात घुसखोरी करू लागल्यामुळे माजी शहर प्रमुख शशिकांत खन्ना,माजी जिल्हा प्रमुख भास्कर लंगोटे,माजी नगराध्यक्ष गजानन डहाळे,सतिष सातोनकर,माजी जिल्हाप्रमुख राजु कापसे,देवा पाटील,सुनिल बावळे पाटील,विजय मराठे यांच्या सारखे असंख्य कट्टर शिवसैनिक प्रवाहाच्या बाहेर गेले असून असाच एक हिंदुहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांनी भारावलेला कट्टर शिवसैनिक शशिकांत खन्ना आज हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने पक्षाने दिलेली ४८ गुन्ह्यांची शिदोरी सोबत घेऊन जगाचा निरोप घेऊन  तुमच्या आमच्यातुन आपले संपूर्ण कुटुंब उघड्यावर ठेवून निघून गेला....माफ करा शशिकांतभाऊ तुमच्या व तुमच्या कुटुंबांच्या झालेल्या अव्हेलना तुम्ही वाढवलेल्या पक्षाचे संधीसाधू पुढारी व त्यांना पोसणारे पक्षातील वरिष्ठ अद्यापही समजू शकले नाही....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या