💥बिड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते ग्रामपंचायत सदस्यपदी निवडीबद्दल गणेश होळंबे यांचा सत्कार...!


💥मैंदवाडी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे गणेश होळंबे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- मैंदवाडी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे युवा नेते गणेश होळंबे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली होती. सोमवार दि.27 डिसेंबर रोजी यशश्री निवासस्थानी बीड जिल्हाच्या दबंग खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार व पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष सतिश मुंडे, भाजपाचे तालुका सरचिटणीस रवि कांदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या