💥राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विजय भांबळें यांच्या कडून बदनामीचे षडयंत्र...!


💥भारतीय जनता पार्टीचे नेते गंगाधर कदम बोर्डीकरांचा आरोप💥

परभणी : जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील मुडा येथील धान्य जप्ती प्रकरणात विरोधक विजय भांबळे यांनी राजकीय द्वेषातून आपल्यासह कुटुंबियांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गंगाधर वामनराव कदम-बोर्डीकर यांनी केला आहे. 

यासंदर्भात जिल्हा पोलिस अधिक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मंगळवारी (२८ डिसेंबर) बोर्डीकर यांनी निवेदन दिले. या वेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, शिवाजीराव मवाळे, रंगनाथ साळुंके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  

जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर विरोधक भांबळे यांनी कुठलेही सबळ पुरावे नसतांना; तसेच आपल्यासह कुटुंबियांचा व भारतीय जनता पक्षाचा या घटनेशी काडीमात्र संबंध नसताना, हेतुतः बदनाम करण्याचा प्रकार चालविला आहे.यामुळे कार्यकर्त्यांत कमालीचा असंतोष आहे. या प्रकरणात संबंधितांविरुध्द कठोर कारवाई करावी; तसेच या संदर्भात सोशल मिडीयातून पसरविले गेलेले मेसेजेस तत्काळ डिलीट करण्याचे आदेशित करावे; अन्यथा आक्रमक आंदोलन, मोर्चातून कार्यकर्त्यांचा रोष व्यक्त होईल.भविष्यातील कारवाया व परिणामांना भांबळेच जबाबदार असतील,असेही निवेदनात नमूद आहे. 

💥राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवा ;-

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील मुडा येथील स्वत धान्य दुकानातील गहू तांदुळाचा धान्यसाठा जप्ती प्रकरणात गंगाधर वामनराव बोर्डीकर यांच्या विरुद्ध प्रशासनाला दिलेल्या बदनामीकारक खोट्या तक्रारीबाबत माजी आमदार विजय भांबळे आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध पोलीसांनी तत्काळ गुन्हा नोंदवावा, अशी मागणी जिंतूर व सेलू येथील भाजपा आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर समर्थकांनी केली. याबाबत जिंतूर व सेलू येथील पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. भाजपाचे सेलू तालुकाध्यक्ष भागवत जोगदंड, मयूर वाघ, जयसिंग शेळके, प्रकाश शेरे, अच्युत कवडे, भाजपाचे जिंतूर शहराध्यक्ष दत्ता कटारे, राजेंद्र थिटे, सुधाकर कुकडे, प्रल्हाद दाभाडे, अमोल देशमुख, सुनील मते आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.,.. 


...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या