💥पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा येत्या २९ जानेवारीला,६ जानेवारीला पत्रकार दिन जिल्हाभर साजरा होणार...!

💥भव्य दिव्य सोहळा गौरक्षण-कौलखेड रिंग रोडवरील हॉटेल राजे लॉन्सवर घेण्यात येणार💥

अकोला (प्रतिनिधी) - मराठी पत्रकार परिषद संलग्नित अकोला जिला पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारी मंडळाची व तालुका अध्यक्ष यांची बैठक आज स्व. पन्नालाल शर्मा सभागृह, पत्रकार भवन अकोला येथे पार पडली. स्व. बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतित आयोजित ६ जानेवारीचा पत्रकार दिन सोहळा जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावर  व जिल्हास्थळावर आयोजित करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार देण्यात येतात. हा पत्रकारीता पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळा येत्या २९ जानेवारी २०२२ रोजी हा भव्य दिव्य सोहळा गौरक्षण-कौलखेड रिंग रोडवरील हॉटेल राजे लॉन्सवर घेण्यात येणार आहे.

अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत  शासनाने पत्रकारांचा सहभाग असलेल्या अधिस्विकृती समिती व तंटामुक्ती समिती तात्काळ गठीत कराव्यात असे ठराव पारित करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा होते. व्यासपिठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजुरकर, उपाध्यक्ष गजानन सोमाणी, रामदास वानखडे विराजमान होते.

बैछकीला कार्यकारी मंडळाचे सदस्य व पदाधिकारी अविनाश राउत, राजु उखळकर, संगिता इंगळे, शेख कुदरूस, प्रदिप काळपांडे, निलेश जवकार, उमेश अलोने, जयेश जगड, विजय शिंदे, हरिओम व्यास, उमेश देशमुख, कमलकिशोर शर्मा,  समाधान खरात, दिपक देशपांडे, मंगेश लोणकर, रविंद्र इंगळे, कमलकिशोर भगत, नंदू सोपले, मोहन जोशी, मुकुंद देशमुख, शरद गांधी, अँड. निलीमा शिंगणे, प्रा. वंदना शिंगणे, रामदास काळे, शाहाबाज देशमुख आदि पदाधिकारी उपस्थित होते. सभेचे संचालन प्रमोद लाजुरकर यांनी केले. सभेच्या प्रारंभी अकोला जिल्ह्यातील अलिकडे दिवंगत झालेले पत्रकार स्व. लक्ष्मण हागे व पत्रकार स्व. बालमुकुंद अग्रवाल यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निलेश जवकार यांनी कळविले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या