💥जिंतूरात वेदांत केसरी संत श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन...!


💥या कार्यक्रमास सर्व भाविक भक्त व माता भगिनी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन💥

जिंतूर : जिंतूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिर येथे वेदांत केसरी ब्र भू संत श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या ५२ व्या  पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आज प्रारंभ झाला आहे दरवर्षी प्रमाणे वै नथुराम बाबा केहाळकर यांनी सुरू केलेला सप्ताह ज्ञानेश्वरी व्यसपीठ वर श्री महेश महाराज जिंतूरकर यांच्या उपस्थितीत होत आहे.


नैमित्तिक कार्यक्रम :-

पहाटे काकडा आरती सकाळी६ते७विष्णू सहस्त्रणाम पाठ ७ते १०ज्ञानेश्वर पारायण ११ते१२गाथा भजन दुपारी १२ते४भागवत कथा भागवत कथाकार हभप विजय महाराज वाघ बनकर यांची कथा होत आहे सायंकाळी ६ते७हरिपाठ रात्री ८ ते१०कीर्तन आज प्रथम दिनी हभप नामनिष्ठ सेवाधारी पौळ बाबा यांचे कीर्तन होईल तर रोज रात्री शनिवारी दि २५हभप शाम महाराज दरगड दि २६रविवार हभप श्री मधुकर महाराज रिडजकर सोमवार दि २७हभप राजेंद्र महाराज चोरडिया औरंगाबाद मंगळवारी दि २८हभप श्री ज्ञानेश्वर महाराज डाके पुणे बुधवार दि २९ हभप श्री विनायक महाराज टाक जिंतूर तर मुख्य दिवस ३०गुरुवार ब्र भू रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या पुण्यतिथी निमित्त  हभप श्री नारायण महाराज पांगरीकर यांचे सकाळी १०ते१२ कीर्तन होईल तर काल्याचे कीर्तन हभप श्री रमेश महाराज जोगवाडकर यांचे कीर्तन होणार आहे या कार्यक्रमास सर्व भाविक भक्त व माता भगिनी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या