💥परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव लवकरच मंत्रीमंडळात ?


💥आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या तारांकित प्रश्‍नावर राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली माहिती💥

परभणी (दि.२३ डिसेंबर) : परभणी येथील अत्यंत गाजावाजा झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय स्थापने संदर्भातील प्रस्ताव राज्य मंत्री मंडळासमोर लवकरच मांडण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज गुरुवार दि.२३ डिसेंबर रोजी विधान परिषदेमध्ये दिली.


विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तीसर्‍या सत्रात आज गुरुवारी विधान परिषदेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय स्थापने संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह अन्य आमदारांनी तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता त्याद्वारे परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आल्याची जोरदार घोषणा राज्य शासनाच्यावतीने सन २०२१ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली. त्या पाठोपाठ राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सप्टेंबर २०२१ रोजी औरंगाबाद येथील ध्वजवंदनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात या संदर्भात घोषणा केली. त्याबाबत व पुढील कारवाईबाबत विशेषतः जागा,निधी,बांधकाम,पदभरती व इतर सर्व बाबी प्रकरणात शासन स्तरावर कोणती कारवाई वा उपाययोजना करण्यात येत आहे. याबाबत सरकारने स्पष्टता करावी,अशी मागणी केली होती. त्यास वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सिंधूदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, अलिबाग (रायगड), सातारा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता दिलेली आहे. तसेच अमरावती व परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय स्थापन करण्याबाबत मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात येत आहे, असे सांगितले.

       तसेच अमरावती व परभणीकरीता जागा निश्‍चितीबाबत आयुक्त, वैद्यकीय शिक्षण यांचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरीता वर्ग-१ ते वर्ग-४ या संवर्गाची ५१० पदे नूसन ४४८ पदे निर्माण करण्याबाबत मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. नव्याने स्थापन झालेल्या व होणार्‍या शासकीय महाविद्यालयातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यास शासन निर्णय दिनांक ९ ऑगस्ट २०२१ अन्वये मान्यता देण्यात आली असून अलिबाग, सातारा, सिंधुदुर्ग व नंदुरबार या ४ महाविद्यालयाकरीता अध्यापकीय पदाबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे संस्थानिहाय जाहीरात प्रसिध्द झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांची रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवेने त्याचप्रमाणे पदोन्नतीने भरण्याची कार्यवाही सुरु आहे, अशी माहितीही देशमुख यांनी दिली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या