💥परभणी ते पंढरपूर सायकल वारीचे परळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वागत....!


💥सायकल चालवा निरोगी राहाचा संदेश देत पंढरपूरकडे रवाना💥

परळी वैजनाथ (दि.२४ डिसेंबर) परभणी येथील३५ सायकलीश्ट यांनी परभणी ते पंढरपूर सायकल वारी काढली असून तीन दिवसात अंदाजे ३५० किलोमीटर अंतर कापणार आहेत. या सायकल वारीचे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनैश्वर प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करण्यात आले.


परभणी येथील सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर यांनी आरोग्य चांगले राहावे यासाठी सायकल चालवणे सुरू केले आहे. हळूहळू यामध्ये जवळपास २०० ते २५० जण ज्यात विविध क्षेत्रातील आरोग्याची काळजी घेणारे सहभागी झाले. यातून सायकल चालवण्याची आवड निर्माण झाली.सध्या हे सर्व सायकलस्वार रोज ५० ते ६० किलोमीटर सायकल चालवताना. यातूनच चार वर्षांपूर्वी पंढरपूर वारीची संकल्पना सुचली. यामध्ये काही डॉक्टर व युवक यात सहभागी झाले. यांनी परभणी ते पंढरपूर अशी सायकल वारी सुरू केली.सलग दोन वर्षे ही वारी काढण्यात आली. नंतर कोरोनाचा प्रभाव सुरू झाल्याने मागील दोन वर्षे बंद झाले. गेल्या काही दिवसांपासून दुसरी लाट ओसरल्याने पुन्हा यंदा सायकल वारी काढण्यात आली. शुक्रवारी (ता.२४) पहाटे ५ वाजता परभणी येथून सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दिवशी जवळपास १२५ किलोमीटरवर कळंब येथे मुक्काम तर दुसरा शेटफळ व तिसऱ्या दिवशी पंढरपूर येथे पोहचणार आहे. या सायकल वारीचे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनैश्वर प्रतिष्ठान, पत्रकार व डॉक्टरांकडून स्वागत करण्यात आले. या सायकल वारीमध्ये शंकर फुटके, डॉ. पल्लवी पवार, डॉ सतिष पवार, डॉ संदीप मोरे, डॉ गितांजली मोरे, डॉ संतोष जाधव, ज्ञानराज खटींग, प्रमोद शिंदे, कैलास तीथे,संतोष चव्हाण, दिपक शिंदे, प्रदुम्न शिंदे,आदी सायकलीश्ट सहभागी झाले आहेत. यांचे स्वागत डॉ. घुगे,श्री.टाक, संगमेश्वर फुटके, छगन क्षिरसागर, चंद्रकांत उदगीरकर, शिवशंकर जठार, ईश्वर राऊत, शिवराज सोनटक्के, शांतलिंग फुटके, शुभम फुटके, विजय राऊत, श्री.वाघमारे, पत्रकार धनंजय आरबुणे, जगदीश शिंदे, महादेव गित्ते यांच्यासह शनैश्वर प्रतिष्ठान चे पदाधिकारी,पत्रकार उपस्थित होते.

या सायकल वारीतील सायकलीश्ट शंभर फुटके यांनी यासंदर्भात सांगितले की, आम्ही या सायकल वारीच्या माध्यमातून नागरीकांना प्रदूषण रोखण्यासाठी जास्तीत जास्त सायकलचा वापर करा, पेट्रोल ची बचत करा,पर्यावरणाचे संतुलन राखा,पाणी आडवा, पाणी जिरवाचा संदेश गावोगावी या वारीच्या माध्यमातून देत आहोत. "सायकल चालवा निरोगी राहा" असा ही संदेश देत आहेत. मी स्वतः गेल्या चार वर्षांत ६३ हजार किलोमीटर सायकल चालवली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या