💥पाथरीत आ बाबाजानी दुर्राणी,दादासाहेब टेंगसे यांचा भव्य सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन...!


💥कामगारांचे सर्व प्रश्न आ.बाबाजानी दुर्रानी यांनी सोडवल्याने त्यांच्या सत्काराचे आयोजन💥 

पाथरी :- राष्ट्रवादी काँग्रेस साखर कामगार युनियन मराठवाड्याचे अध्यक्ष आ बाबाजानी दुर्रानी यांच्या पुढाकाराने श्री रेणुका शुगर्स लि.पाथरी या साखर कारखान्यातील कर्मचारी व कामगार यांना मागील ३ वेतनवाढ कराराच्या माध्यमातून कारखाना प्रशासनाकडून कामगारांना मागील पाच वर्षात एकूण रक्कम १४ हजार २०० रुपये एव्हढी भरघोस पगारवाढ व हाप ग्रेडेशन कामगारांना फुल ग्रेडेशन कामगारांप्रमाणे पगार वाढ करण्यात आली.त्यामुळे कामगारांचे सर्व प्रश्न आ बाबाजानी यांनी सोडवले यानिमित्त कामगारांतर्फे युनियन चे अध्यक्ष आमदार बाबाजानी दुराणी तसेच माजी शिक्षण सभापती तथा युनियन चे उपाध्यक्ष दादासाहेब टेंगसे यांचा भव्य सत्कार दि.२ जानेवारी २०२२ वार रविवार रोजी सकाळी ११ वाजता कारखाना परिसराच्या कार्यस्थळावर भव्य सत्कार करण्याचे  व शेतकरी मेळाव्याचे आयोजन कारखाना युनियन समितीने केले आहे.

 या मेळाव्याला मुंजाजीराव भाले पाटील,जुनेद भैया दुराणी,अनिलराव नखाते,सुभाष आबा कोल्हे,चक्रधरराव उगले,गंगाधरराव गायकवाड,अशोकराव गिराम,एकनाथराव शिंदे,दत्तराव मायनदळे,कुंडलीकराव सोगे,माधवराव जोगदंड,तुकारामजी जोगदंड,हनान खान दुराणी,नितेश भोरे,सदाशिव थोरात,राधाकिशन डुकरे,राजेश ढगे,रमेशराव तांगडे,राजेश्वर गलबे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या सत्कार समारंभ व शेतकरी मेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युनियन चे प्रतिनिधी सचिव शिवाजी शिंदे,कोषध्यक्ष उद्धव आबा नखाते,बालासाहेब मेहत्रे,दामोधर आमले,राजाराम केंदळे,आनंत सोळंके व सर्व कामगार यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या