💥पुर्णा-झिरोफाटा मार्गावरील एरंडेश्वर शिवारातील कला केंद्राच्या इमारती जवळ तिहेरी अपघात ; एकाचा मृत्यू तर दोघे जख्मी...!


💥झिरो फाट्याहुन पूर्णेकडे जाणाऱ्या चारचाकी कार व समोरुन येणारी दुचाकीची समोरा समोर जोरदार धडक💥

पुर्णा : परभणी-वसमत मार्गावरील झिरो फाट्याहुन पूर्णेकडे जाणाऱ्या चारचाकी कार व समोरुन येणाऱ्या दुचाकी वाहनाची समोरा समोर जोरदार धडक झाल्याने या भयंकर  अपघातात दुचाकीस्वार तरुण धावत्या उसाच्या ट्रॅक्टरच्या ट्राॅलीखाली गेल्याने जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आहे या अपघाताच्या घटनेत अन्य दोघे जन गंभीर जखमी झाले आहेत.


पुर्णा तालुक्यातील एरंडेश्वर शिवारातील कला केंद्राजवळ सदरील तिहेरी अपघाताची घटना सोमवाच्या रात्री घडली असून घटनेतील जख्मींवर परभणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या २२ वर्षीय तरुणाचे नाव गौरव राजु रामपूरकर रा. एरंडेश्वर तालुका पूर्णा असे असून सदरील तरुण पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता तर तो नुकताच सुट्टी असल्याने गावी आला होता गौरवचा मित्र राम बाबाराव काळे वय २३,गजानन रंगनाथ शिंदे वय २२ यांच्या सोबत एरंडेश्वर येथुन झिरोफाट्या कडे दुचाकी क्र. एम.एच.२२/जी/८४९९ वरून जात असताना समोरून येणाऱ्या चारचाकी कार क्र.एम.एच.२६/एके/२०२१ व दुचाकीची जोरात धडक झाली.


त्याचवेळी रस्त्याच्या बाजुने उसाने भरलेले (एम.एच.३८/ एक्स/ १२६४) हे ट्रॅक्टर जात होते . गौरव रामपूरकर हा त्या ट्रॅक्टराच्या खाली फेकल्या गेल्याने त्यास गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू पावला. त्याच्या सोबत असलेले राम काळे, गजानन शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताच्या आवाजाने परिसरातील वाहन चालक, शेतकरी यांनी तातडीने तीघांनाही परभणी येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. दरम्यान डॉक्टरांनी गौरवला तपासून मृत घोषित केले. घटनेची माहीती मिळताच पोलीसानी घटनास्थळी जाऊन वाहने ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या