💥ड्रॉप रोबॉल कुमारी राज्य संघाच्या प्रशिक्षकपदी प्रवीण बद्दे यांची निवड....!


💥महाराष्ट्र राज्य ड्रॉप रोबॉल असोसिएशनचे सचिव दिनेश अहिरे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले💥

परभणी (दि.२५ डिसेंबर) - ड्रॉप रोबॉल कुमारी राज्यस्तरीय संघाच्या प्रशिक्षकपदी प्रवीण बद्दे यांची नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्र राज्य ड्रॉप रोबॉल असोसिएशनचे सचिव दिनेश अहिरे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे झोडगे जि नाशिक येथे दि २६ ते २७ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या सराव शिबिरातून राज्याचा संघ निवडला जाणार आहे.

त्यानंतर भिलवाडा (राजस्थान)येथे २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ड्रॉप रोबॉलची राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे प्रवीण बद्दे हे खेडुळा ता.पाथरी येथील जि प प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत त्यांनी आजपर्यंत अनेक ड्रॉप रोबॉल खेळाडूंना प्रशिक्षण देऊन जिल्ह्याचे व राज्याचे नाव देशात उंचावले आहे त्यांच्या निवडीचे जिल्हा सचिव सदाशिव बोबडे रामचंद्र डुकरे प्रसिद्धीप्रमुख शिवाजी बोबडे सह परभणी जिल्हा ड्रॉप रोबॉल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी  केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या