💥परळी तालुक्यातील नाथ्रा गावचे सुपुत्र डाॅ.एकनाथ मुंडे यांना एकता जीवनगौरव पुरस्कार.....!


💥अशी घोषणा फाउंडेशनचे संस्थापक सदस्य राजेश बीडकर आणि नितीन कैतके यांनी केली💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने येत्या २९ व ३० डिसेंबर रोजी चौथे एकता मराठी साहित्य संमेलन पिंपळनेर ता.शिरूर का.जि.बीड येथे संपन्न होणार असून या संमेलनात परळी तालुक्यातील नाथ्रा गावचे सुपुत्र डाॅ.एकनाथ मुंडे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची आहे. अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक सदस्य राजेश बीडकर आणि नितीन कैतके यांनी दिली. 

                  व्यंगचित्रकार दिपक महाले यांच्या अध्यक्षतेखालील पार पडलेली ही बैठक लखुळ मुळे आणि प्राचार्य माही शेख यांनी बोलावली होती. परळी वैजनाथ तालुक्यातील नाथ्रा गावचे डाॅ.एकनाथ मुंडे यांचे नाव वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक, साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही आदराने घेतले जाते. जवळपास गेल्या पाच दशकांपासून ते या भागातील ॠग्णांची निस्वार्थ वृत्तीने सेवा करत असून कोरोनाकाळामध्येही त्यांनी या कार्यात खंड पडू दिलेला नाही. तसेच, सहा वर्षांपासून ते या भागात ग्रामीण साहित्य संमेलनाचेही आयोजन करत असतात. त्यांच्या या चौफेर कामगिरीची दखल घेत एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कोअर कमिटीच्या दि.२२ डिसेंबर रोजी पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीत त्यांना येत्या संमेलनामध्ये दि.२९ डिसेंबर रोजी 'एकता जीवनगौरव पुरस्कारा'ने सन्मानित करण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला. या बैठकीसाठी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष साहित्यिक अनंत कराड, सचिव पत्रकार गोकुळ पवार, कथाकार प्रा.डाॅ.भास्कर बडे, कोशाध्यक्ष शिवलिंग परळकर, सहसचिव कैलास तुपे, महादेव राऊत, अभिमन्यू कातखडे यांची उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या