💥वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तहसिल कार्यालयामध्ये राष्टीय ग्राहक दिन साजरा...!


💥यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार नरसैया कोंडागुरले हे होते💥



फुलचंद भगत

वाशिम:-ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी आणि तो बाजारात खरेदीच्या हक्काबाबत सक्षम व्हावा, याकरिता विविध ग्राहक संघटना लोकांना जागरूक करीत आहेत. या सर्वांसाठी 24 डिसेंबर हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. हा दिवस 'जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो.याच दिनाचे औचित्य साधत मंगरुळपीर तहसिलच्या सभागृहामध्ये ऊत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.


भारताचा एक सुजाण नागरिक म्हणून, राज्यघटनेने आपल्याला नागरिकत्वाचे हक्क दिले तसेच, ग्राहक म्हणूनही आपल्याला काही अधिकार देण्यात आले आहेत. त्यातील पहिला आणि सर्वात मोठा हक्क म्हणजे ग्राहकांना दिलेल्या किंमतीच्या समान वस्तू त्यांना मिळाली पाहिजे.वाजवी किंमत आणि शुद्धता या ग्राहकाच्या मुख्य गरजा आहेत. ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी ग्राहक संरक्षण कायदा बनविला गेला आहे. या कायद्यानुसार आता कोणताही ग्राहक अनुचित व्यापाराची तक्रार करू शकतो. यासाठी त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. पूर्वीच्या काळात व्यावसायिकांच्या व्यवहारात होणारी हेराफेरी लक्षात घेऊनच हा कायदा बनवला गेला आहे.असे मत मंगरुळपीर येथील तहसिलच्या सभागृहामध्ये आयोजीत राष्टीय ग्राहक दिनाच्या औचित्याने मान्यवरांनी व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार नरसैया कोंडागुरले हे होते.तर निवासी नायब तहसिलदार रवि राठोड,निरिक्षण अधिकारी रुपाली सोळंके,पुरवठा निरिक्षक सिमा दोंदल यांच्यासह प्रमुख अतिथी महाराष्ट ग्राहक परिषद मुंबई महाराष्टचे अशासकिय सदस्य प्राध्यापक सुधिर घोडचर,नितिन बंग,डाॅक्टर राऊत,इंडेन गॅसचे संचालक पुरुषोत्तम चितलांगे,ग्राहक मंचाच्या वनमाला पेंढारकर,पञकार सुधाकर चौधरी,फुलचंद भगत,रवि इंगळे यांचेसह महसुल कर्मचारी,सेतु सुविधा केंद्राचे संचालक,डिलर,दुकानदार तसेच विविध दुकानदार यांचेसह ग्राहकांची ऊपस्थीती होती.


फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या