💥बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांच्या उपोषणाला काँग्रेसचा जाहिर पाठिंबा...!


💥काँग्रेस पक्षाचे शहरादूर शेख लवकरच सामाजिक न्यायमंञी ना.मुंडेंची काँग्रेस शिष्टमंडळ घेऊन भेट घेणार💥

परळी (प्रतिनिधी) - बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांना  देण्यात येत असलेली अधिछात्रवृत्ती- 2018 एमफिल ते पीएचडी पाच वर्षांसाठी नियमित करण्यात यावी, या मागणीकरिता  राज्यातील विविध विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी परळी येथे गेली सहा दिवसापासून साखळी उपोषण करत आहेत. या साखळी उपोषणाला परळी काॕग्रेसचा जाहिर पाठिंबा शहराध्यक्ष बहादुर शेख यांनी दिला आहे.

बुधवार दि.29 डिसेंबर रोजी परळी शहर काॕग्रेसचे शहराध्यक्ष बहादुरभाई व काॕग्रेस शिष्टमंडळाने गेली सहा दिवसापासुन सुरु असलेल्या संशोधक विद्यार्थ्यांच्या उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली.काॕग्रेस पक्ष पुर्ण पणे आपल्या पाठिशी खंभीर हुभा असुन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी ना.धनंजय मुंडे यांची भेट घेऊन आपला ज्वलंत प्रश्नमार्गी लावण्यासाठी काॕग्रेस पक्ष पाठपुरावा करेल असे  शहराध्यक्ष बहादुर शेख यांनी विद्यार्थ्यांना आश्वाशीत केले.

या काॕग्रेसच्या शिष्टमंडळात गणपत आप्पा कोरे,शशी शेखर चौधरी,शिवाजी देशमुख,गुलाबराव देवकर,अलीम भाई, फरकुंद अली बेग,शेख सिकंदर भाई,बबन मंनाले,सचिन बारगजे अदीजण सहभागी होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या