💥'मामाचं गाव' उभारण्याची गरज सेलूतील किर्तन प्रसंगी इंदुरीकरांचे मत...!


💥व्यथा वेदनांना सहन करण्याचे सामर्थ्य देण्यासाठी प्रत्येकाने खर्‍या अर्थाने माणूसपण जिवंत ठेवण्याची आवश्यकता💥

सेलू : मोबाईलचा अतिवापर  शरीर आणि मनालाही अत्यंत घातक ठरत असून, नात्यांमधील सुसंवाद, संस्कार लोप पावत आहेत. हे चिंताजनक चित्र बदलण्यासाठी मुलांच्या जीवनातून हरवत चाललेलं संस्काररूपी 'मामाचं गाव' पुन्हा मनामनांत उभारण्याची गरज आहे, असे मत निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी मंगळवारी (२१ डिसेंबर) सेलू येथे व्यक्त केले या वेळी नामदेव महाराज ढवळे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मुकेश बोराडे, संयोजक नगराध्यक्ष विनोद बोराडे, साईराज बोराडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.


स्वच्छ पर्यावरणासाठी सौरऊर्जेचा वापर, गाव आणि वार्ड तेथे व्यायामशाळा, ग्रंथालय हवे, पारंपरिक शेतपिकांऐवजी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरावी, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, घरदार, अंगण आणि मंदिराइतक्या स्वच्छ शाळेत शिक्षणासाठी डिजिटल व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करा, असे आवाहन इंदुरीकर यांनी केले. करोना काळात बारा बलुतेदार, धर्म टिकविण्यासाठी धडपड करणारे कीर्तनकार, कथाकार, गायक, वादक, कलाकार, हातावर पोट असणारे लाखो माणसे, शेतकरी, मजुरांची अवस्था अत्यंत चिंताजनक झाली आहे. या व्यथा वेदनांना सहन करण्याचे सामर्थ्य देण्यासाठी प्रत्येकाने खर्‍या अर्थाने माणूसपण जिवंत ठेवण्याची आवश्यकता आहे, असे इंदुरीकर म्हणाले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या