💥पुर्णेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस साजरा...!


💥केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या वाढदिवसा निमित्त शासकीय ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप💥

पुर्णा (दि.२५ डिसेंबर) - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय समाजकल्याण  राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज शनिवार दि.२५ डिसेंबर २०२१ रोजी पुर्णा तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तालुकाध्यक्ष पांडुरंग आहिरे यांच्या नेतृत्वाखाली येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सहाय्यक पोलिस निरिक्षक आश्रोबा घाटे,डॉ.प्रशांत खराटे,डॉ.शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत फळे वाटप करण्यात आली.

यावेळी पुर्णा तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने रेल्वे स्थानक परिसरातही गरजवंतांना फळांचे वाटप करण्यात आले यावेळी भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवलें यांचा वाढदिवस जल्लोशात साजरा करण्यात आला यावेळी पुर्णा तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका सचिव भिमा मल्हारे,रिपाईचे जेष्ठ नेते यादवराव भवरे,माजी नगरसेवक अशोकराव धबाले,प्रकाश खरे,प्रशांत एंगडे,मिलिंद जोगदंड,नागराज गायकवाड,वंचित बहुजन आघाडीचे पुर्णा तालुकाध्यक्ष शामसुंदर काळे यांची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या