💥अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते दिव्यांग ओळखपत्र वाटप...!


💥जिल्हा नियोजन भवनात हा कार्यक्रम पार पडला💥

अकोला (दि.२९ डिसेंबर) - राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग,विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते दिव्यांग ओळखपत्र वाटप करण्यास प्रारंभ करण्यात आला.

जिल्हा नियोजन भवनात हा कार्यक्रम पार पडला. जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या दिव्यांग सर्वेक्षणात निष्पन्न झालेल्या दिव्यांग व्यक्तींना आवश्यक प्रमाणपत्रे व ओळखपत्र  देण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ आज पालकमंत्री ना.कडू यांच्या हस्ते  करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, विधान परिषद सदस्य ऍड.किरण सरनाईक, विधानसभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ.हरीश पिंपळे, आ. रणधीर सावरकर, आ.नितीन देशमुख तसेच जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे , निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या