💥विभाग प्रमुखाच्या नाव नंबर च्या पाट्या तहशील कार्यालयाच्या आवारात लावाव्यात...!


💥राष्ट्रीय ग्राहक दिनी सखाराम बोबडे पडेगावकर यांची सूचना💥

गंगाखेड (दि.२४ डिसेंबर) - तहसील कार्यालयात कामासाठी खेड्यातून येणारा प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक असतो. त्या ग्राहकांच्या सोयीसाठी कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांच्या नाव व नंबर च्या पाट्या तहसील कार्यालयाच्या आवारात लावाव्यात अशी सूचना परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त बोलताना शुक्रवारी केली.

तहसील कार्यालयाच्या सभागृहात  राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. अध्यक्ष स्थानी तहसीलदार येलमे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, ग्राहक मंचाचे अध्यक्ष उत्तमराव आवंके, ग्राहक पंचायतचे तालुक्याचे सचिव मुंजाभाऊ लांडे,  महिला आघाडी तालुकाध्यक्ष सीमाताई घनवते, शहराध्यक्ष गोपाल मंत्री, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष फड, तालुकाध्यक्ष शुद्धोधन सावंत, पुरवठा विभाग नायब तहसीलदार मंदार इंदुरकर , अव्वल कारकून गिनगिने आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना बोबडे म्हणाले की चांगल्या कामाचि  सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. तहसिल कार्यालयाने ग्राहक दिनाच्या निमित्ताने संकल्प करून महाराष्ट्रातील तहसील कार्यालयान आदर्श घ्याव अस काम आपल्या कार्यालयान करावं. विभाग प्रमुख यांचे नाव मोबाईल नंबर व हुद्दा अशा आशयाचा  पाट्या तहसील कार्यालयात लावाव्यात जेणेकरून तहसील कार्यालयात येणाऱ्या शेतकऱ्यांची सोय होईल. असा आदर्श घालून देण्याचे काम तहसील कार्यालय ने करावे अशी सूचना सखाराम बोबडे यांनी केली. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी, स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या