💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभरातील महत्वाचे अपडेट....!

   


💥31 डिसेंबर, नववर्ष स्वागतासाठी प्लॅन करताय ? थांबा.. नववर्ष स्वागतासाठी सरकारची नियमावली जाहीर💥 

[ब्रेकिंग/ बातम्या / हेडलाईन]

✍️ मोहन चौकेकर                                    

  ● मोठ्या शहरात तिसऱ्या लाटेला सुरुवात, पुढील 6 आठवडे चिंतेचे; टास्क फोर्सचा इशारा.

● 31 डिसेंबर आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्य सरकारकडून नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्बंध.

● मॉल ते सिनेमा हॉल पुन्हा निर्बंध लागणार का, राजेश टोपे म्हणतात, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन लवकरच निर्णय.

➖➖➖

*🥇 Gold-Silver Price*

*सोने -* 49,010 रुपये प्रति 10 ग्रॅम.

*चांदी -* 62,500 रुपये प्रति किलो.

➖➖➖

● देशभरात गेल्या 24 तासात 9 हजार 195 कोरोना रुग्णांची नोंद, तर 302 जणांचा मृत्यू; राज्यातही कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ. 

● केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात हजर राहावे, सिंधुदुर्ग पोलिसांची नोटीस; तर नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावर उद्या सुनावणी होणार. 

● हळदीवर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय, कृषी उत्पन्न बाजार समिती जीएसटी विभागाकडे अपील करणार.

● झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल दरात थेट 25 रुपयांची कपात.

➖➖➖

*📊 Share Market :*

*सेन्सेक्स -* 57,806.49 (-90.99)

*निफ्टी -* 17,213.60 (-19.65)

➖➖➖

● एटीएसकडून योगी आदित्यनाथांसह संघाच्या नेत्यांना फसवण्यासाठी दबाव, मालेगाव बॉम्बस्फोटातील साक्षीदाराचा गौप्यस्फोट.

● भारतीय फ्लाईटमध्ये अमेरिकन जॅझ प्रमाणे भारतीय संगीत वाजणार, नागरी उड्डाण मंत्रालयाचं सर्व एअरलाईन्सला पत्र.

● पहिल्या कसोटीवर भारताचं वर्चस्व, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी दिलं 305 धावांचा लक्ष....

✍️  मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या