💥वाशिम येथील गोटे महाविद्यालयातील कँम्पस इंटरव्यूला उस्फूर्त प्रतिसाद...!


💥या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.जी.एस.कुबडे हे होते💥

मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात करिअर गाईडन्स व प्लेसमेंट सेल आणि आयसीआयसीआय बँकेच्या संयुक्त विद्यमाने रिलेशनशीप मॅनेजर या पदाकरीता कँम्पस इंटरव्यूचे आयोजन दि. 28 डिसेंबरला करण्यात आले होते. त्यास विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. जी.एस.कुबडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रभू श्री रामचंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. नारायणराव गोटे हे होते. तर मार्गदर्शक म्हणून सिनिअर मॅनेजर नीट लिमिटेड, मुंबई येथील प्रतीक जाधव व मयूर पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. व्ही.ए. गायकवाड यांनी केले. त्यात त्यांनी कँम्पस इंटरव्यूचे आयोजन या आधीदेखील महाविद्यालयाने अनेकवेळा केलेले असून, त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार महाविद्यालयातूनच रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले.

डॉ. नारायणराव गोटे यांनी विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रांमध्ये जायचे आहे, त्यानुसार ज्ञान अवगत करून पुढे जाण्याचे आवाहन केले. सिनिअर मॅनेजर प्रतीक जाधव यांनी बँकेमध्ये नोकरी करण्यासाठी संबंधित विद्यार्थी कोणत्याही शाखेचा पदवीधर असला तरी चालतो, त्याच्याकडे समोरच्या व्यक्तींवर प्रभाव टाकण्याची क्षमता, चांगले व्यक्तिमत्व, उत्तम चारित्र्य यासारखे गुण असणे आवश्यक असल्याचे सांगितले. सिनिअर मॅनेजर मयूर पाटील यांनी रिलेशनशीप मॅनेजर या पदाची काय भूमिका आहे, उत्तम बँक कर्मचारी होण्यासाठी कोणते गुण आवश्यक आहेत, भाषाविषयाचे ज्ञान किती आवश्यक आहे याची उदाहरणासहित माहिती दिली. कँम्पस इंटरव्यूला आजू-बाजूच्या परिसरातील जवळपास पाचशेच्या वर विद्यार्थ्यांनी आँनलाईन नावनोंदणी केली. तर जवळपास दिडशे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. यादरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी या पदांसबंधीच्या सकारात्मक व नकारात्मक बाजूंच्यासंदर्भात शंका उपस्थित करून, आपले समाधान करून घेतले. अनेक विद्यार्थ्यांनी रिलेशनशीप मॅनेजर या संदर्भात प्रमुख मार्गदर्शकासोबत चर्चा केली. अध्यक्षीय भाषणातून डॉ. जी.एस.कुबडे यांनी विद्यार्थ्यांनी अपार मेहनत करून यश संपादन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयातील करिअर गाईडन्स आणि प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. व्ही. बी. चांदजकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार डॉ. डी.आर.दामोदर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.बी.आर.तनपुरे, डॉ. व्ही.एन.लांडे, डॉ.एस.व्ही.रूक्के, डॉ. फिरोज खान,डॉ.डी.एन.लांजेवार,डॉ.पी.एस. पाथरकर,डॉ.व्ही.ई.डोणगावकर,प्रा.भारत पट्टेबहाद्दूर, प्रा.देशमुख, डॉ. पी.जे.गोटे आदिंनी अथक परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या