💥परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी नागरीकांचे धरणे आंदोलन....!


💥शहरात रुग्णालयाला भव्य इमारत उपलब्ध असुन सुध्दा फक्त व्यवस्था उपलब्ध नसल्याने नागरीकांची हेळसांड💥

परभणी (०२ डिसेंबर) - जिल्ह्यातील सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरु करावे या मागणी साठी येथील नागरीकांनी रुग्णालयाच्या ईमारती समोर बसुन जागरण गोंधळ आंदोलन केले . शहरात ग्रामीण रुग्णालयाची भव्य  ईमारत बांधुन दोन वर्षापासून तयार आहे . या रुग्णालयासाठी डॉक्टर, परीचारीका तंत्रज्ञ अशा जवळपास पन्नास पदांची मंजुरी  मिळाली आहे. पण बांधकाम झाल्या पासुन ही ईमारत गेले अनेक वर्ष वापरा विना पडुन होती. कोवीड सुरु झाल्या नंतर येथे तात्पुरत्या स्वरुपात कोवीड सेंटर सुरु करण्यात आले होते. कोविड संपल्यानंतर ही ईमारत कोवीड साठीच वापरली जात आहे. सोनपेठ तालुक्यासह परळी,पाथरी व मानवत तालुक्यातील अनेक गावातील नागरीक आरोग्य सेवेसाठी सोनपेठ वर अवलंबून असतात. शहरासह तालुक्यातील नागरीकांना सोनपेठ येथे येऊन अधिक उपचारासाठी परळी अंबेजोगाई येथे पाठवल्या जाते. शहरात भव्य इमारत उपलब्ध असुन सुध्दा फक्त व्यवस्था उपलब्ध नसल्याने नागरीकांची हेळसांड होत आहे.

शहरातील नागरीकांनी एकत्र येऊन  ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी सोनपेठकरांच्या वतीने धरणे व जागरण गोंधळ आंदोलन दि.२ रोजी रुग्णालयाच्या ईमारती समोर केले ,या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आंदोलन कर्त्यांना  रुग्णालय सुरु करण्यासाठी परभणी येथे व्यापक चर्चा करण्यासाठी बैठकीचे निमंत्रण दिले व लवकरात लवकर ग्रामीण रुग्णालय सुरु करण्याचे आश्वासन दिले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे कल्पेश राठोड, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपणे, शहर प्रमुख कृष्णा पिंगळे, नगरसेवक अमृत स्वामी,सुनिल बर्वे, लक्ष्मण खरात,आशोक कानमोडे,लक्ष्मीकांत कांदे, शरद बनसोडे, रंगनाथ सोळंके,  सुमीत पवार, सतीश देशमुख, भगवान पायघन,  सुधीर बिंदु, विश्वंभर गोरवे, , अशोक भुसारे, जनार्धन झिरपे, गणेश कदम, गौस कुरेशी, विनोद चिमणगुंडे, काँग्रेस आय  चे शहराध्यक्ष राजू सौदागर, शुभम सोन्नर, गणेश जोशी, संतोष अंबुरे, नितेश लष्करे,  राहुल चव्हाण,शेख युन्नुस यांच्या सह वैद्यकीय अधिक्षक डॉ सिध्देश्वर हालगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुभाष पवार यांच्यासह फौजदार गिरी हे उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या