💥नांदेड येथील हॉकी स्पर्धेसाठी सोळा राष्ट्रीय हॉकी संघांची नोंद : 3 जानेवारी पासून 48 व्या गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट...!


💥अशी माहिती दुष्टदमन क्रीडा युवक मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक स. गुरमीतसिंघ नवाब यांनी दिली💥

नांदेड (दि.29 डिसेम्बर) : येथील दुष्टदमन क्रीडा युवक मंडळ नांदेड तर्फे श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या जयंती पर्वास समर्पित 48 व्या ऑल इंडिया श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट मध्ये राष्ट्रीय दर्जाचे एकूण सोळा हॉकी संघ भाग घेत आहेत. अशी माहिती दुष्टदमन क्रीडा युवक मंडळाचे अध्यक्ष आणि नगरसेवक स. गुरमीतसिंघ नवाब (डिंपलसिंघ) यांनी दिली.  


स. गुरमीतसिंघ नवाब यांनी पुढे सांगितलं की येत्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला दि. 3 जानेवारी 2022 रोजी खालसा हायस्कूल मिनीस्टेडियम येथे राष्ट्रीय हॉकी स्पर्धेस उत्साहात सुरुवात होत आहे. यंदा 48 वीं स्पर्धा असून स्पर्धा 50 व्या वर्षात येऊन पोहचली आहे. या स्पर्धेत हॉकी इंडियाच्या नियमानुसार लीग आणि नॉकआउट प्रणालीने स्पर्धा खेलविण्यात येतील. यात एकूण सोळा संघांचा समावेश असेल सुरुवातीला लीग प्रणाली साठी चार "पूल" तयार करण्यात आले असून प्रत्येक पूल मध्ये चार चार संघांचा समावेश असेल. त्यानुसार "ए" पूल मध्ये 1) इएमइ जालंधर 2) इटारसी हॉकी क्लब 3) एक्सेलेंसी हॉकी अकादमी पुणे आणि 4) हॉकी औरंगाबाद संघांचा सहभाग असेल. 


पूल "बी" मध्ये 1) आर्टलरी नाशिक 2) कस्टम मुंबई 3) बाबा फुल्ला स्पोर्ट्स अकादमी अमृतसर 4) चार साहबजादा हॉकी क्लब नांदेड हे चार संघ असतील. पूल "सी" मध्ये 1) सिग्नल कोर जालंधर 2) रिपब्लिकन मुंबई 3) भोपाल इलेवन आणि 4) डेक्कन हैदराबाद संघांचा समावेश असेल. तसेच पूल "डी" मध्ये 1) छत्तीसगढ इलेवन 2) एचपीसीएल करनाल हरियाणा 3) एसएस क्लब अमरावती आणि खालसा युथ क्लब नांदेड असे संघ खेलणार आहेत. 

पहिला सामना दि. 3 जानेवारी रोजी पहिला सामना एक्सलेन्सी हॉकी अकादमी पुणे आणि हॉकी औरंगाबाद संघादरम्यान सकाळी 8 वाजता सुरु होणार आहे. यासाठी खालसा हायस्कूल मिनी स्टेडियम मैदान विशेषरित्या तयार करण्यात आले आहे. ही स्पर्धा देशात नवाजलेली असून प्रथम विजेता संघाला रोख एक लाख रुपये बक्शीस आणि मोमेंटो चषक प्रदान केले जाते. तर उपविजेता संघाला रोख 51 हजाराचे पारितोषिक आणि चषक दिले जाते...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या