💥परभणी येथे पंतप्रधान मोदी सरकारने कृषी विरोधी कायदे मागे घेतल्याबद्दल शेतकऱ्यांनी केला आनंदोत्सव साजरा...!


💥भारतीय कम्युनिष्ठ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व घोषणाबाजी केली💥

परभणी (दि.१९ नोव्हेंबर) : केंद्रातील पंतप्रधान मोदी सरकारने शेतकरी विरोधी असलेले तीन कृषी कायदे मागे घेतल्याबद्दल आज शुक्रवार दि.१९ नोव्हेंबर रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ भारतीय कम्युनिष्ठ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व घोशणाबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.



  कॉ. राजन क्षीरसागर, शिवाजी कदम, संतोष देशमुख, माधुरी क्षीरसागर, श्रीनिवास जोेगदंड, लक्ष्मण काळे, रामराव देशमुख, प्रसाद गोरे, नितेश सुक्रे, संदीप सोळंके, सय्यद अझहर, डॉ. सुनील जाधव, मंगल खामगांवकर, अनिता घोंगडे, ज्योती कुलकर्णी, भारत गोरे, शेख नदीम, सचिन देशपांडे, संपत पवार, गणपत गायकवाड आदींनी फटक्यांची आतिषबाजी केली.

राज्यसभेत बहुमत नसतांना विरोधी खासदारांना निलंबीत करुन हुकूमशाही पध्दतीने लादलेले शेतकरी विरोधी तीनही कायदे आंदोलनामुळे केंद्र सरकारला मागे घ्यावे लागले, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. या आंदोलनात शहीद झालेल्या व्यक्तींचा हा विजय आहे, असेही मत व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या