💥शेतीचा विजपुरवठा सुरळीत करा..गाढे पिंपळगावकरांची मागणी....!


💥शेतीसाठी होणारा विजपुरवठा खंडित झाल्याने पिकांचे होत आहे नुकसान💥 

परळी वैजनाथ दि.२६ (प्रतिनिधी)

         तालुक्यातील गाढे पिंपळगाव परिसरातील शेतकऱ्यांना विजवितरण कंपनीकडून व्यवस्थित विज पुरवठा होत नसून  सातत्याने अपुरा व खंडित विजपुरवठा होत आहे. तो सुरळी करा व परळी बीड रस्त्याला जोडणाऱ्या पिंपळगाव रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण करा अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा गाढे पिंपळगाव वाशीयांनी दिला आहे.

                 तालुक्यात यंदा ५० वर्षानंतर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नाथरा सबस्टेशहून शेतीसाठी होणारा विजपुरवठा खंडित झाला आहे. कारण नाथरा सबस्टेशनला  डिघोळ येथील १३२ के.व्ही सबस्टेशनहून विजपुरवठा होत होता. पण नाथरा परिसरात वाण नदीला आलेल्या पुरामुळे नदीतील विजपुरवठा करणारे काही पोल पडले तर काही वाहून गेले आहेत. यामुळे सध्या नाथरा सबस्टेशनला डाबी १३२ केव्ही सबस्टेशनहून विजपुरवठा सुरू आहे. पण तो अपुरा व सातत्याने खंडित होत आहे. सध्या रब्बीचा हंगाम सुरू आहे. ज्वारी, हरभरा आदी पिकांची पेरणी झालेली आहे. जोरदार पावसामुळे विहीरी, इंधनविहीरी पाण्याने डबडबल्या असून पाणी असूनही विजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना शेतकऱ्यांना पाणी देता येत नाही. त्यामुळे विजवितरण कंपनीच्या ज्या पोलचे नुकसान झाले आहे. ते त्वरित दुरुस्त करून पहिल्या सारखा विजपुरवठा सुरळीतपणे द्या अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान परळी बीड रस्त्याला जोडणाऱ्या गाढे पिंपळगाव ते फाटा या दोन किलोमीटर अंतरावरचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडले आहे. गुत्तेदाराने फक्त बीबीएम करुन सोडलज आहे. आता या बीबीएमची खडीही उखडण्यास सुरुवात झाली असून पुर्वी प्रमाणे खड्डे पडत आहेत. यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून लाखों रुपये निधी मंजूर करण्यात आला होता मात्र गुत्तेदाराने फक्त बीबीएम करून सोडून दिले आहे. हे काम तात्काळ पुर्ण करावे अन्यथा बांधकाम विभागासमोर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा गाढे पिंपळगाव येथील गावकऱ्यांनी दिला आहे. या दोन्ही प्रश्नाकडे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी लक्ष घालून हे प्रश्न तात्काळ सोडवण्याची मागणी करण्यात येत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या