💥परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत वादाला कंटाळून आ.बाबाजानी दुर्राणी यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा..!


💥राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या श्रेष्ठीने घेतलेल्या काही निर्णयाच्या निषेधार्थ जिल्हाध्यक्षपदाचा दिला राजीनामा💥

परभणी/पाथरी (दि.२५ नोव्हेंबर) :- परभणी जिल्ह्यातील धर्मनिरपेक्ष राजकारणातील सर्वसमावेशक सर्व धर्मांसह सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन जिल्ह्यातील विकासाला सातत्याने चालना देणारे नेतृत्व म्हणून परिचित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्राणी यांनी हे गेल्या काही महिन्यांपासून या जिल्ह्यातील पक्षांतर्गत घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या श्रेष्ठीने घेतलेल्या काही निर्णयाच्या निषेधार्थ जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

आमदार दुराणी हे श्रेष्ठीवर कमालीचे नाराज होते.या अस्वस्थेपोटी आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ते आपली नाराजी व्यक्त करतील अशी स्पष्ट चिन्हे दिसत होती.कारण ते अलीकडे ते पक्षीय वर्तुळातून थोडी बाजूला सरकले होते गेल्या काही महिन्यांपासून या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मोठ्या प्रमाणात रूसवे-फुगवे सूरू आहेत.विशेषतः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनी घेतलेल्या भूमिका,माजी आमदार विजय भांबळे यांची जिल्हा परिषद अंतर्गत राजकारणातील खेळ्या व पक्ष श्रेष्ठ आणि त्यांना समर्थन तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांच्याबरोबर अलीकडच्या काळातील संघर्ष, सोनपेठ येथील माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांचा परस्परच पक्ष प्रवेश सोहळा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परभणी महानगर जिल्हाध्यक्ष पदावर श्रेष्ठीद्वारे माजी महापौर प्रताप देशमुख यांची निवड या साऱ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आमदार बाबाजानी दुर्रानी के कमालीचे अस्वस्थ होते.कमालीचे नाराज होऊन बसले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या