💥शेलुबाजार येथे कोरोना प्रतिबंधक लसिकरणाला ऊत्फुर्त प्रतिसाद ; बाबाराव पवार यांचा पुढाकार....!


💥आतापर्यत एकुन 177 लोकांनी कोविडशिल्ड व कोव्हॅक्शिनचे डोस घेतलेत💥

✍️फुलचंद भगत

वाशिम:-कोरोना महामारीला रोखण्यासाठी युध्दपातळीवर कोरोना प्रतिबंधीत लसिकरणाची मोहीम तेज करण्यात आली असुन मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील रास्त भाव धान्य दुकानदार बाबाराव पवार यांनी पुढाकार घेवून राशन ग्राहकांना कोरोणा प्रतिबंधीत लसिकरणाचे महत्व पटवुन देवुन लसिकरण करण्यासाठी प्रोत्साहित केले.बाबाराव पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरीकांनी चांगला प्रतिसाद देत आतापर्यत एकुन 177 लोकांनी कोविडशिल्ड व कोव्हॅक्शिनचे डोस घेतलेत.


मंगरुळपीरचे उपविभागिय अधिकारी,तहसिलदार,ता.आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनात शेलुबाजार येथील रास्त धान्य दुकानामध्ये लसिकरणाची मोहिम राबवुन ही मोहिम यशस्वी केली.रास्तभाव दुकानदार पवार यांनी घरोघरी जावुन लोकांना लसिकरणाचे महत्व पटवुन दिले.सरपंचा प्रमिलाबाई पवार यांनीही ग्रामपंचायतमार्फत लसिकरणासाठी आवश्यक त्या सुविधा ऊपलब्ध करुन लसिकरण मोहिम यशस्वितेसाठी मोलाची कामगिरी बजावली.प्रशासनानेही शेलुबाजार येथील मोहिमेचा आढावा घेवुन समाधान व्यक्त केले.शासनाच्या विविध योजना लोकांपर्यत पोहचविन्यासाठी पुढाकार घेणार्‍या बाबाराव पवार यांचेही प्रशासनाकडुन कौतुक करण्यात आले आहे.या लसिकरण मोहिमेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी,आशा सेविका,अंगणवाडी सेविका,अंगनवाडि मदतनिस,जि.प.शाळेचे शिक्षक,ग्रा.प.सरपंचा व कर्मचारी यांची ऊपस्थीती होती.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या