💥स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : जिल्हा ग्रंथालय कार्यालयात दिवाळी अंकाचे प्रदर्शन...!


💥या प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले💥

✍🏻फुलचंद भगत

वाशिम : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे 17 नोव्हेंबर रोजी दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले.


यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. दिवाळी अंक प्रदर्शनात सामना, माझा, जत्रा, सकाळ, मार्मिक, लोकप्रभा, माहेर, धनंजय, कालनिर्णय, चंद्रकांत, अनुराग, अहेर, दिपोत्सव, वसुधा, मेनका, आवाज, शब्दगांधार, शामसुंदर, वेदान्वश्री, शुरसेनानी, अक्षर, वसंत, गृहलक्ष्मी, फिरकी, घरचा वैद्य, रुचकर, भारत पर्यटन, दिवाळी फराळ, पुढारी, मनोकल्प, मैत्र, दुर्ग, आरोग्य, भन्नाट, महाराष्ट्र टाईम्स व लोकसत्ता इत्यादी अंक ठेवण्यात आले आहे. यावेळी वरिष्ठ लिपीक ग.भी. बेंद्रे, एस.एस. कंडारकर, विलास कांबळे, स्पर्धा परिक्षेचे तयारी करणारे विद्यार्थी व विद्यार्थींनींची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या