💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्वाच्या बातम्या....!


💥संतापजनक मुंबईतील कुर्ल्यामध्ये 20 वर्षीय तरुणीची बलात्कार करुन हत्या💥

✍️ मोहन चौकेकर

1) दक्षिण आफ्रिकेतल्या नव्या व्हेरियंटमुळे राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये, संपूर्ण लसीकरणाशिवाय प्रवास करणाऱ्यांना 500 रु दंड, तर खासगी वाहतूकदारांनाही दंड भरावा लागणार 

2) दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींकडून आढावा , तर दक्षिण आफ्रिकेची विमानसेवा रद्द करण्याची गरज, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी 

3) पुढील आठवड्यात मुंबईत होणाऱ्या क्रिकेट मॅचला 25 टक्के प्रेक्षकांनाच परवानगी, आरोग्य विभागाची नियमावली जाहीर, ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय 

4 ) केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन अनिल देशमुखांप्रमाणेच अडकवण्याचा प्रयत्न, नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे तक्रार करणार

5) अहमदनगरमध्ये शेवगाव आगाराच्या तीन एसटीवर दगडफेक, चालक जखमी, अनेक आगारांमध्ये बससेवा अजूनही ठप्पच, तर सांगलीत दोन हजार कर्मचारी कामावर रुजू 

6 ) देशातील मुलींची पहिली शाळा पुन्हा गजबजणार; पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाड्यात वर्ग भरणार! 

7) देशात गेल्या 24 तासांत 8,318 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 465 रुग्णांचा मृत्यू , तर राज्यात शुक्रवारी 852 नव्या रुग्णांची नोंद, 34 जणांचा मृत्यू 

8) एका व्यक्तीच्या फोटोमागे लसीकरणाचे अपयश दीर्घ काळ लपवता येणार नाही; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला

9 ) संतापजनक मुंबईतील कुर्ल्यामध्ये 20 वर्षीय तरुणीची बलात्कार करुन हत्या

10) कानपूर कसोटीत टीम इंडियाकडे तिसऱ्या दिवसाखेर 63 धावांची आघाडी; अक्षर पटेल आणि अश्विनच्या फिरकीसमोर न्यूझीलंड पहिल्या डावात 296 धावात गारद, भारताच्या 1 बाद  14 धावा...

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या