💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्त्वाच्या बातम्या....!


💥कोरोना पॉझिटिव्ह कशासाठी ? तर इन्शुरन्स पॉलिसीसाठी! औरंगाबादमधील गंभीर प्रकरण उघडकीस💥

 ✍️ मोहन चौकेकर

1. एसटी संप: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावरील बैठक निष्फळ , भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार, एसटीच्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांचा इशारा 

2 महत्वपूर्ण निकाल!  कपड्यांवरुन स्पर्श असला तरी तो लैंगिक अत्याचारच', मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल सुप्रीम कोर्टाकडून रद्द 

3. ...तर कुटुंबाला तुरुंगात टाकीन, पहिल्या पत्नीला समीर वानखेडेंची धमकी; नवाब मलिकांचा दावा , जन्मदाखल्यानंतर समीर वानखेडेंचा शाळा सोडल्याचा दाखला सोशल मीडियात व्हायरल , क्रांती रेडकरकडूनही समीर वानखेडेंचा जन्मदाखला प्रसारीत 

4.  26 नोव्हेंबरच्या प्रस्तावित पुणे दौऱ्यात अमित शाहांनी पवारांच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचं टाळलं, त्याऐवजी महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार 

5. महात्मा गांधी आणि नेताजी एकमेकांना पूरक; सुभाषचंद्र बोस यांच्या कन्येकडून कंगनाच्या वक्तव्याचा समाचार 

 6. कोरोना पॉझिटिव्ह कशासाठी? तर इन्शुरन्स पॉलिसीसाठी! औरंगाबादमधील गंभीर प्रकरण उघडकीस / समोर 

 7. कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावतोय; 24 तासांत 12 हजार कोरोनाबाधितांची नोंद, 470 मृत्यू  , राज्यात बुधवारी कोरोनाबाधितांची संख्या एक हजाराच्यावर, तर 32 जणांचा मृत्यू 

8. अल्पवयीन मुलीचे अत्याचार प्रकरण; मुलीला जेवण्याचं अमीष दाखवून अत्याचार करणारा नराधम गजाआड , अल्पवयीन मुलीवर क्रौर्याची परिसीमा; दारू पाजून पोलिसांनी केले अत्याचार 

9. शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या 30-30 घोटाळा प्रकरणी पहिला गुन्हा; 

10. पेटीएमच्या शेअरकडून गुंतवणूकदारांची घोर निराशा.. शेअर बाजारातील आजवरचा सर्वात मोठा आयपीओ ठरलेल्या पेटीएमच्या शेअर्सची सुरुवात 28 टक्क्यांच्या घसरणीने, गुंतवणूकदारांच्या 35 हजार कोटींचा चुराडा  पेटीएमच्या शेअर दरात घसरण...

✍️  मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या