💥पुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची सक्तीची विज बिल वसुली तात्काळ थांबवा...!


💥संभाजी सेनेचे तालुकाध्यक्ष गोविंद मोरे यांनी सक्तीच्या विज बिल वसुली विरोधात दिले निवेदन💥

 पुर्णा (दि.२३ नोव्हेंबर) - तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपांच्या विद्युत बिलांची सक्तीने वसुली करण्यास सुरूवात करण्यात आली असून विद्युत बिल भरण्यास असमर्थ असलेल्या शेतकऱ्यांचे विद्युत कनेक्शन तोडण्यात येत आहेत आसमानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर हा एकप्रकारे अन्याय असून प्रशासनाने कृषी पंपांच्या विद्युत बिलांची सक्तीची सक्तीची वसूली तात्काळ थांबवावी अशी मागणी संभाजी सेनेच्या वतीने तालुकाध्यक्ष गोविंद मोरे यांनी एका निवेदनाद्वारे तहसिलदार पल्लवी टेमकर यांच्याकडे केली आहे.


पुर्णा तालुका संभाजी सेनेच्या वतीने तहसिलदार टेमकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की शेतकऱ्यांना सुलतानी संकटातून वाचवणे अत्यंत आवश्यक असतांना विद्युत वितरण कंपनीकडून कृषी पंपांच्या विद्युत बिलांची सक्तीने वसुली केली जात आसे सन २०२०/२१ या चालू वर्षा मध्ये शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे अगोदरच मेटाकुटीला आलेला असतांना त्यात महाराष्ट्र राज्यात सातत्याने ओला दुष्काळ असल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे शेतकऱ्यांना पेरणी कशी करायची हा गभीर प्रश्न पडलेला असतांनाच विद्युत महावितरणने ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करून त्यांना धारेवर धरले असून त्यांच्याकडून सक्तीने विद्युत बिल भरून घेतले जात आहे.

मागील वर्षाचा प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे आणी ते सर्व शेतकरी पिक विमा योजनेस पात्र असून सुध्दा विमा कंपनीने शेतकऱ्यांना अनेक विसंगत कारणे सांगून विमा भरपाई देण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे शेवटी शेतकऱ्यांच्या तोंडाला विमा कंपनीने सुध्दा पाने पुसली आहेत त्याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे राज्य शासनाने शेतकऱ्यांना जी मदत दिलेली आहे ती देखील शेतकऱ्यांचे समाधान करणारी नसल्याने ती तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना मिळण्या अगोदरच महावितरणने त्या मदतीवर डोळा ठेवत शेतकऱ्यांना अवेळी मिळणारा विद्युत पुरवठा खंडीत केल्याने तालुक्यात शेतकऱ्यांचा आत्महत्येचा आकडा वाढण्याची भिती असून आपण या प्रकरणा मध्ये तात्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांना या संकटातून वाचवावे असेही निवेदनात नमूद करण्यात आले असून या निवेदनावर संभाजी सेनेचे तालुकाध्यक्ष गोविंद मोरे यांची स्वाक्षरी आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या