💥जनसेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या आरोग्य शिबिरात ६५० जणांची तपासणी व औषधोपचार....!


💥कोविड लसीकरणासाठी घेतला पुढाकार💥

================

अंबाजोगाई (प्रतिनिधी) - येथील जनसेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिरात ६५० हून अधिक जणांनी सहभाग घेतला.यावेळी आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अविनाश साठे यांनी दिली आहे.

येथील जनसेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्था ही सामाजिक बांधिलकीतून सातत्याने विविध उपक्रम राबवित असते.संस्थेचे अध्यक्ष अविनाश साठे यांची कन्या कुमारी अनन्या हिच्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थनगर येथे नेत्र तपासणी,मधुमेह व रक्तदाब तपासणी,आरोग्य तपासणी निदान व मोफत औषधोपचार करण्यात आले.तसेच याप्रसंगी मानसोपचार व व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन ही करण्यात आले होते.शासनाच्या श्रावणबाळ वृद्धापकाळ पेंशन व संजय गांधी निराधार योजनेच्या १५० नवीन लाभार्थ्यांची नोंदणी यावेळी करण्यात आली.स्ञीभ्रुण हत्या बाबत जनजागृती करणाऱ्या व 'बेटी बचाव,बेटी पढाव' या बाबतचा मौलिक संदेश देणाऱ्या फोटो फ्रेमचे सात अंगणवाड्यांना वाटप करण्यात आले.यासोबतच प्रभाग क्रमांक ९ सिद्धार्थनगर व परिसरातील नागरीकांसाठी कोविड लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात १५० हून अधिक जणांचे लसीकरण करण्यात आले.कार्यक्रमास माजी आमदार पृथ्विराज साठे,कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्यप्रशासक गोविंदराव देशमुख, माजी सभापती अमर देशमुख,राजेंद्र लोदगेकर,नगरसेवक अशोक मोदी, नगरसेवक वाजेद खतीब,नगरसेवक संजय गंभीरे, नगरसेवक मिलिंद बाबजे,अनिल पिंपळे,प्रा.रमेश सरवदे,पंडित हुलगुंडे, पटेल मामा,हाजी अब्दुल कुरेशी,शेख रौफभाई, सुधाकर जोगदंड, मुक्तार मोमीन,रमेश सोनकांबळे,बालाजी शेरेकर,सरफराज भाई,फैजान भाई, रिजवान भाई,जुनेद सिद्दीकी,हकीम लाला पठाण,संस्थेचे अध्यक्ष अविनाश साठे यांच्यासह मान्यवरांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी बोलताना माजी आमदार पृथ्विराज साठे यांनी कुमारी अनन्या हिच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.जनसेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अविनाश साठे हे सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवितात असे सांगून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रमेश सरवदे यांनी केले.तर प्रास्ताविक करताना अविनाश साठे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विषद केली.उपस्थितांचे आभार ऋषिकेश वाघमारे यांनी मानले.नेत्र तपासणी शिबिरासाठी डॉ.स्नेहल शिवराज पेस्टे (जालना),मानसोपचार व व्यसनमुक्ती शिबिरासाठी डॉ.शिवराज नरसिंग पेस्टे (जालना),मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबिरासाठी डॉ.गणेश लक्ष्‍मण खंदारकर (पुणे) या तज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली.तर कोविड लसीकरणासाठी रविना चव्हाण,मनीषा जाधव,नदीम खान,वर्षा इंगळे,रमेश काटे या आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.श्रावणबाळ वृध्दापकाळ पेंशन व संजय गांधी निराधार योजनेच्या नवीन लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठी दिलीप पालके,राम जोगदंड, धनराज जोगदंड यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी यशराज अलझेंडे, सचिन होके,दीपक साठे,ऋषिकेश वाघमारे,शंकर साठे, नयन गव्हाणे, समाधान साठे, आदित्य कांबळे, सौरभ चव्हाण,सोहन अहिरे,रवी साठे,शिवम साठे,दिनेश साठे, अक्षय खरटमोल, अक्षय कोरडे,शेख युनूस,अनिकेत साठे, शेख निसार,शंकर रणदिवे,सय्यद अहेमद,किशन लोखंडे,विक्रम रणदिवे,सुजित साठे यांनी पुढाकार घेतला. प्रभाग क्रमांक ९ सिद्धार्थनगर व परिसरातील नागरिकांनी जनसेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात सहभागी होऊन शिबिराचा लाभ घेतला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या