💥पाथरी येथे हजरत टिपू सुलतान यांचा जन्मोत्सव सामाजिक उपक्रमांनी साजरा....!


💥रक्तदान शिबिराचे उदघाटन युवा नेते जुनेद भैया दुर्रानी यांनी केले💥

पाथरी:-हजरत टिपू सुलतान यांच्या जन्मोत्सवा निमित्त पाथरी येथे युवकां कडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे शनिवारी सकाळी ११ वाजता भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. ईदगाह मैदान इंदिरानगर पाथरी बारा वाजता शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे फळांचे वाटप करण्यात आले तर ओंकार वर्धा आश्रम येथे फळ वाटप तसेच गोड जेवण मीठे चावल असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. 


रक्तदान शिबिराचे उदघाटन युवा नेते जुनेद भैया दुर्रानी नगरसेवक एजाज खान नगरसेवक अजय सिंह पाथ्रीकर अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष अहमद आतार यासीन पठाण शेख खालेद सिकंदर टेलर यांच्या नेतृत्वात  संपन्न झाले. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवक मंडळी नयुम खान पठाण शेख मोहम्मद सुलतान खान शेख चांद मोसिन शहा रफिक पठाण शेख इरफान हर्षवर्धन ढवळे आशिष ढवळे चंद्रकांत हिवाळे सतीश गवारे प्रेम खंदारे शेख अवेज वाजेद बेग शेख मुस्ताक मुन्ना सिद्दिकी आरेफ इनामदार शेख अन्वर यांनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या