💥सेवाव्रती पञकार म्हणून युवा पञकार तथा सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना पुरस्कार प्रदान....!


💥तळागाळातील लोकांसाठी न्याय मिळवुन देण्यासाठी पञकारीता करणार्‍या पञकारीतेचा सन्मान💥

✍🏻फुलचंद भगत

वाशिम:-सामाजीक कार्यात सदैव अग्रेसर असणारे तसेच तळागाळातीललोकांना न्याय मिळावा यासाठी आपल्या कार्य आणी लेखणीव्दारे प्रयत्न करणारे वाशिम जिल्ह्यातील ख्यातनाम युवा पञकार तथा सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना यंदाचा ज्ञानगंगा साहित्य मंडळ साप्ता.करंजमहात्म्य परिवाराकडुन सेवाव्रती पञकार म्हणून पञकार फुलचंद भगत यांना पुरस्कार देवून कार्यक्रमाचे ऊद्घाटक शिक्षक आमदार अॅड.किरण सरनाईक व कार्यक्रमाचे अध्यक्ष पञकार निलेश सोमाणी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या ऊपस्थीत स्मृतीचिन्ह,शालश्रिफळ व पुष्पगुच्छ देवुन सत्कार दि.२१ नोव्हेंबर रोजी करण्यात आला.

         पञकारीता हे व्रत आहे.पञकारीतेच्या माध्यमातुन जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडुन त्यांना शासनदरबारी मांडुन न्याय देन्याची सदैव भुमिका जोपासणारे व पञकारीतेचा वसा घेवून सामाजिक कार्य करणारे वाशिम जिल्ह्याचे नामांकित युवा पञकार व सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी अल्पकाळातच आपल्या लेखणीची चुणुक दाखवुन अनेक ऊपेक्षितांना न्याय मिळवुन दिला.आपल्या लेखणीच्या जोरावर सदोदीत परखडपणे सत्य बाजु मांडुन पञकारीतेमध्ये छाप पाडली.सोबतच सामाजीक कार्यामध्येही हिररीने भाग घेवून अनेक गरजुंची मदतही केली.याआधीही फुलचंद भगत यांना त्यांच्या ऊत्कृष्ट पञकारीता आणी सामाजिक कार्याची दखल घेवुन पुरस्कृत केले आहे.दि.२१ नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे ज्ञानगंगा साहित्य मंडळ व करंज महात्म्य कडुन सेवाव्रती पञकार पुरस्कार देवुन पञकार फुलचंद भगत यांचा मान्यवरांच्या ऊपस्थीतीत सत्कार केला.यावेळी मुख्य आयोजक जेष्ठ पञकार संजय कडोळे,शिक्षक आमदार अॅड. किरण सरनाईक,जेष्ठ पञकार निलेश सोमानी,मा.नगराध्यक्ष अरविंद लाठीया,दत्तराज डहाके,जि.प.चे माजी समाजकल्याण सभापती जयकिशन राठोड,बाजार समितीचे संचालक ललित चांडक आदींची ऊपस्थीती होती.मीळालेल्या पुरस्काराने मनोबल ऊंचावले असुन यापुढेही शोषित,पिडित आणी तळागाळांतील लोकांसाठी असेच कार्य सुरु ठेवून न्याय मिळवून देण्याची माझी भुमिका असेल तसेच पञकारीतेच्या माध्यमातुन परखडपणे पञकारीता करुन लोकहित जोपासीन असे मत युवा पञकार तथा सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी पुरस्कार स्विकारतांना व्यक्त केले.


फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या