💥निराधार विधवा अपंग वयोवृध्द लोकांची लूट करणाऱ्या अधिकाऱ्याला सोडणार नाही - राजकुमार सुर्यवंशी


💥जिल्हाध्यक्ष सुर्यवंशी यांनी आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर बाळासाहेब चव्हाण यांना दिले निवेदन💥


पूर्णा ; ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉक्टर हरिभाऊ गाडेकर यांनी  कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने वयाचे प्रमाणपत्र देण्याकरिता शासकीय फिस म्हणून अनेक वर्षापासून विधवा अपंग वय वर्धा निराधार लोकांची लुट सुरू केली परंतु जमा झालेल्या रक्कमे पैकी शासनाकडे एकही रुपया न भरता खूप मोठा अपहार केला असल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सुर्यळंशी यांनी केला आहे.

या प्रकरणी रुग्णालय अधिक्षक डॉक्टर गाडेकर यांची तात्काळ चौकशी करून संबंधित प्रकरणात जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदन जिल्हाध्यक्ष सुर्यवंशी यांनी आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर बाळासाहेब चव्हाण यांना दिले आहे..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या