💥मराठवाड्यातील बंद केलेल्या सर्व गाड्या सूरु करण्याची रेल्वे प्रवासी महासंघाची मागणी...!


💥परभणी रेल्वे स्थानकावर या मागणीसाठी 25 नोव्हेंबर ला करण्यात येणार घंटानाद आंदोलन💥           

परभणी / प्रतिनिधी - मराठवाडयातून अचानकपणे बंद केलेल्या रोटेगाव - नांदेड गाडीसह दौड,मनमाड आणि औरंगाबाद गाडी तत्काळ सूर करण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली असून या मागणीसाठी 25 नोव्हेंबर ला परभणी स्थानकावर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.

आज नांदेड येथे प्रवासी महासंघाच्या पदाधिकार्यांनी नांदेड चे रेल्वे अतिरिक्त व्यवस्थापक के. नागभूषणराव भेट घेऊन निवेदन सादर केले राज्यात एस टी चा संप सुरू आहे अश्या वेळी रेल्वेने अतिरिक्त गाड्या सुरू करणे अपेक्षित होते परंतु चक्क रेल्वे ने रोटेगाव- नांदेड डेमु गाडी अचानक बंद केली ती तात्काळ सुरू करा या शिवाय   नांदेड - दौड , नांदेड - पुणे या  गाडया सुरू करा लोकडाऊन पूर्वी सुरू असलेली नांदेड - औरंगाबाद गाडी सुरू करा आदी मागण्या करण्यात आल्या.आठ दिवसात या गाड्या सुरू करण्याचा अलटीमेंटम देण्यात आला तसेच या मागण्याची आठवण करून देण्यासाठी परभणी रेल्वे स्थानकावर दिनांक 25 नोव्हेंबर 21 गुरुवारी घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा देण्यात आला या वेळी अरुण मेघराज ,प्राचार्य सुरेश नाईकवाडे,शंतनू डोईफोडे,उमाकांत जोशी, किरण चिद्रवार, अमित कासलीवार, खदीर लाला हाश्मी, दयानंद दीक्षित आदी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या