💥चिखलीतील प्रतिष्ठित व्यावसायिक आनंद इलेक्ट्रॉनिक्सचे कमलेश पोपट यांच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक...!


💥कमलेश पोपट यांच्यावर दि.16 नोव्हेंबरच्या रोजी अज्ञात दरोडेखोरांनी तलवारीने वार करुन त्यांचा खुन केला होता💥

 ✍️ मोहन चौकेकर  

चिखली : :-चिखली शहरातील अत्यंत वर्दळीचा व कायम गजबजलेला असलल्या जयस्तंभ चौक परिसरातील आनंद इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक कमलेश पोपट (५५) यांच्यावर दि 16 नोव्हेंबरच्या रात्री ९.३० ते १० च्या दरम्यान अज्ञात दरोडेखोरांनी तलवारीने वार करुन त्यांचा निदर्यतेने खुन केल्याची घटना घडली होती. या आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आवाहन पोलीस प्रशासनासमोर उभे ठाकले होते. विशेष म्हणजे आरोपींनी कुठलाच सुगावा मागे ठेवला नव्हता. त्यातच घटनेला ८ दिवसांचा कालावधी उलटुनही आरोपींचा काहीच तपास न लागल्याने व्यापारी वर्गासह सर्वसामान्यं नागरिकांचा पोलीस प्रशासनावर रोष निर्माण होत होता.

जिल्ह्यासह संपुर्ण चिखली शहरात खळबळ उडवून देणाऱ्या या खुन प्रकरणाच्या तपासाबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांनी दि 25 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितले की , गुन्हयाचा तपास आम्ही पोलीस निरीक्षक अशोक ना.लांडे ठाणेदार व सपोनि अमोल बारापात्रे पोस्टे. चिखली यांनी सुरु केला गुन्हयाच्या तपासात पोलीस स्टेशन चिखली, स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा, सायबर पोलीस स्टेशन बुलडाणा येथील अधिकारी व अंमलदार यांचे एकुण 07 तपास पथके तयार करण्यात आले. होती. तपास पथकाच्या मदतीने रेकॉर्डवरील गुन्हेगार, गोपनिय बातमीदार, भौगोलीक परिस्थीती व तांत्रिक पुराव्याच्या आधारे गुन्हयाचा सखोल व बारकाईने तपास करण्यात आला.  त्यावेळी अशाच  पध्दतीचा वापर करुन पो स्टे देऊळगाव राजा  अप 467/2021 कलम 394,34 भादवि प्रमाणे गुन्हा दि.3/11/2021 रोजी नोंद झाला होता. गुन्हयातील आरोपीतांचे वर्णन साम्य असल्याने  देऊळगावराजा तपास पथक पो.नि.जयवंत सातव ,पोउपनि किरण खाडे, यांचे पथकासह तपास सुरु करण्यात आला. गोपनिय माहीतीच्या आधारे देऊळगावमही, धोत्रा नंदाई, गावात कोंबीग ऑपरेशन राबविण्यात येवुन आरोपी 1. राहुल किसन जायभाये वय 23 वर्ष रा. देऊळगांवमही ता. देऊळगांव राजा 2. राहुल अशोक बनसोडे वय 20 वर्ष रा. धोत्रा नंदई ता. देऊळगांवराजा 3. नामदेव पंढरीनाथ बोंगाणे वय 20 वर्ष रा. धोत्रा नंदई ता. देऊळगांवराजा यांना दिनांक 25/11/2021 रोजी गुन्हयात अटक करण्यात आली. सदर गुन्हयातील अटक आरोपींना तपास दरम्यान चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, यातील आरोपी राहुल किसन जायभाये हा सहा महिन्यापुर्वी आनंद इलेक्ट्रॉनिक्स दुकानात होम थेटर घेण्यासाठी आला होता होमथेटरच्या किंमतीवरुन त्यावेळेस आरोपी व कमलेश पोपट यांचे वाद झाले होते व आरोपी याने मृतक कमलेश पोपट यांचेमध्ये वाद झाले. कमलेश पोपट यांचा जुन्या घटनेचा राग डोक्यात ठेवुन त्यांना धडा शिकवण्याचा कट आरोपींनी रचुन हत्या केली. यातील आरोपी राहुल किसन जायभाये या गुन्हेगारी पार्श्वभुमीचा असून याच्यावर औरंगाबाद पोलीस स्टेशनला 302 , 394 चे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याचा शोध घेतांना दे राजा व चिखली येथील दोन्ही घटनेतील आरोपींमध्ये साम्य दिसत असल्याने गुन्हयासाठी  दोन्ही गुन्हांमध्ये आरोपींनी वेगवेगळया दुचाकिंचा वापर केला होता मात्र यातील  दे. राजा येथील घटनेत वापरलेली दुचाकी महत्वपुर्ण ठरली, या दुचाकीच्या अर्धवट नंबर वरुन पोलीसांना आरोपीपर्यंत पोहचण्यास यश मिळाले. यावेळी ही प्राथमिक माहिती असून तपासामध्ये अजुन काही तथ्थे समोर येऊ शकतात असेही त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तंर देतांना सांगितले.

             सदर गुन्हयाचे  तपास मध्ये पोनि. अशोक ना. लांडे, ठाणेदार पोलीस स्टेशन चिखली, यांचेसह पो. नि. स्थागुशा बुलडाणा, पो.नि. सायबर पोलीस स्टेशन, पोनि. जयवंत सातव पोलीस स्टेशन देऊळगांवराजा, सपोनि. अमोल बारापात्रे, सपोनि. प्रविण तळी,सपोनि दुधाळ, सपोनि. विलासकुमार सानप, सपोनि.दत्तात्रय वाघमारे, पोउपनि. किरण खाडे, पोउपनि. निलेश शेळके, पोउपनि. धनंजय इंगळे, पोउपनि. श्रीकांत जिंदमवार, पोउपनि. श्रीराम व्यवहारे, पोउपनि. सचिन चौहान, सफौ. अशफाक शेख, सफौ. अकील काझी, पोहेका सुधाकर काळे, पोहेका शरद गिरी, पोहेका निवृत्ती चेके, पोहेका अताउल्ला खान, पोहेका शशीकांत धारकरी, पोहेका शेळके, पोहेका श्रावण गोरे, नापोका राजु आडवे, नापोका सदानंद चाफले, नापोका माधव कुटे, नापोका गणेश पाटील, नापोका डिगांबर कपाटे, नापोका दिनेश बकाले, नापोका युवराज राठोड, नापोका सुनिल रिंढे, नापोका कडुबा मुंढे, नापोका. सुनिल खरात, नापोकॉ. पुरुषोत्तम आघाव, पोकॉ. उमेश राजपुत, पोकॉ. शिवानंद तांबेकर, नापोकॉ. विजय किटे, पोकॉ. सुनिल राजपुत, पोकॉ.अजय इटावा,पोकॉ. विजय सोनोने, पोकॉ. कैलास ठोंबरे, पोकॉ. पंढरीनाथ मिसाळ, पोकॉ.निलेश उर्फ राजु मोरे, पोकॉ. रुपेश जोरवार, पोकॉ. शिवशंकर कायंदे,नापोका लक्ष्मीकांत इंगळे, मपोका. मंजुषा चिंचोले, मपोका. पंचशिला ससाणे, मनिषा मोरे,अर्चना सरदार,आदी यांनी विशेष परिश्रम करुन सदर  गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे...

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या