💥मराठवाड्यातील रेल्वेच्या मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे रोको करण्याचा सर्व पक्षीय नेत्याचा निर्धार....!


💥परभणी रेल्वे स्थानकावर आज मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने करण्यात आले घंटानाद आंदोलन💥

परभणी (दि.२५ नोव्हेंबर) - दक्षिण मध्य रेल्वेने मराठवाड्यातील जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. या विभागातील मागण्या पूर्ण न झाल्यास मोठा रेल्वे रोको करण्याचा  निर्धार सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी रेल्वे स्थानकावरील घंटानाद आंदोलनात केला. मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.या आंदोलनास जेष्ठ विधिज्ञ ऍड अशोक सोनी, राष्ट्रवादी चे शहर जिल्हाद्यक्ष प्रताप देशमुख, शिवसेनेचे संपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, भाजपचे किसान आघाडीचे ऍड रमेश गोळेगावकर, भाकप चे राजन क्षिरसागर, ऍड माधुरीताई क्षिरसागर ,शेकाप चे  किर्तीकुमार बुरांडे , प्रहार चे जिहाध्यक्ष शिवलिंग बोधने, शेतकरी नेते माणिक कदम आदी उपस्थित होते. या वेळी घंटानाद आणि थाळीनाद, ताशा लावून परिसर दणाणून सोडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांनी घंटानाद आंदोलन करण्यामागील भूमिका स्पष्ट केल. मराठवाड्यातील रेल्वे प्रवाश्याचा समस्या वर्षनोवर्षं कायम आहेत. हा विभागाकडे दमरे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते . लॉकडाऊन नंतर अजूनही रेल्वे सुविधा मिळत नाहीत. या भागातील काही गाड्या अजूनही बंद आहेत. त्या तात्काळ सुरू कराव्यात . आता हा विभाग अन्याय सहन करणार नाही या विभागातील बंद रेल्वे सुरू न झाल्यास परभणीत मोठा रेल रोको करावा असा निर्धार उपस्थित सर्व पक्षीय नेत्यांनी केला. या वेळी रेल्वे प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, राजेंद्र मुंढे, रितेश जैन, कादिर लाला हाश्मी, रुस्तुम कदम, रवींद्र मुथा,अरुण पवार, विष्णुदास बार्बीन्ड, आर. डी. गौतम, वसंत लंगोटे, कृष्णा अग्रवाल, श्रीनिवास लाहोटी, धनराज जाधव, वसंत पारवे, विलास पाते, अशोक अवचार, विठ्ठल काळे, नगरसेवक चंद्रकांत शिंदे, दिलीप सूळ, आदित्य लंगोटे, तानाजी बनसोडे, विलास मोरे, गजानन लव्हाळे, शंकर भागवत, कुणाल, गायकवाड, राजकुमार भांबरे, रामेश्वर आवरगंड, संतोष जाधव, श्याम साखरे,  राजकुमार जंगले, भाऊसाहेब देशमुख, अक्षय अन्नपूर्वे, विषमबर पतेवार, जनार्धन लंगोटे, विलास मोरे, अभिजित कांबळे, काजी हफेझ, तानाजी बनसोडे आदी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या