💥पुर्णा तालुक्यातील कानडखेडचे सरपंचपद अविश्वासाच्या भोवऱ्यात...?


💥विद्यमान सरपंचां विरोधात असंतोष; सदस्यांची मोर्चेबांधणी‌ सुरू💥

पूर्णा/प्रतिनिधी

विद्यमान सरपंचाची ग्रामपंचायत मध्ये सुरू असलेली एकाधिकारशाही, सदस्यांना  विश्वासात न घेता घेतले जाणारे निर्णय सदस्यांत वाढलेला असंतोष यामुळे तालुक्यातील कानडखेड गावचे सरपंचपद हे अविश्वासाच्या भोव-यात सापडले असल्याचे बोलले जात असून, काही सत्ताधारी सदस्यांनी विरोधी सदस्यांच्या सुरात सूर मिसळून 'आता बदल अटळ' असे म्हणत मोर्चे बांधणी सुरू केली असल्याची जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे.

     मागील साडेतीन वर्षांपूर्वी पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत कानडखेड ग्रामपंचायत मध्ये जनतेने सरपंच म्हणून तूकाराम सालपे यांना निवडणूक दिले.त्यांच्या सोबत पॅनलचे सहा सदस्यही निवडुन आले.मागील साडेतीन वर्षांत जनतेची लोकहीताची कामे करणे अपेक्षित असताना जनसेवक सरपंचांनी ग्रामस्थांचा अपेक्षा भंग केला. याउलट  विद्यमान सरपंचांनी मनमानी कारभार व एकाधीकार शाही ,सदस्यांना विश्वासात न घेता कारभार सुरू ठेवला यामुळे सदस्यांत तीव्र असंतोष निर्माण झाला.घरकुल योजना, रोहीयो, विकास कामात गैरव्यवहार, यामुळे यामुळे सरपंच व सदस्यांमध्ये वादविवादही झाले. घरकुल व शौचालय कामात गैरप्रकार झाल्याने सदस्यांनी प्रशासनाकडे तक्रार ही दाखल केली.शेवटी काही सदस्यांनी या असंतोषामुळे सरपंच तुकाराम सालपे यांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काही सत्ताधारी विरोधी सदस्यांची एक गुप्त बैठक घेऊन सरपंचाविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याची खात्री लायक माहीती आहे.येत्या काही दिवसांत विद्यमान सरपंचाविरोधात अविश्वास ठराव दाखल करुन सदस्य सहलीला रवाना होणार असल्याचीही चर्चा कानखेड गावात जोरात सुरू आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या