💥भारतीय राष्ट्रवादी पार्टीची रेशनिग काळाबाजारी रोख ण्यासाठी महाराष्ट्र मध्ये सोशल ऍक्शन फोर्स कमिटीची निवड.....!


💥भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे राज्य प्रभारी डॉ भगवानभाई दांठिया यांनी केली घोषणा💥

आपल्या महाराष्ट्र व मुंबई मध्ये गोर गरीब,सामान्य जनतेला स्वस्त दरात  शासन तर्फे राशनचे वितरण करण्यासाठी शिधावाटप केंद्रा पासून वाहतूक दार नेमण्यात आले आहेत,परंतु या शिधावाटप केंद्रा कडून मोठया प्रमाणावर रेशनिग ची काळाबाजार आणि वाहतूकदार कडून काही रेशनिग माफियांच्या संगमताने रेशनिगची तस्करी केली जात आहे,यात काही रेशनिग विभागाचे  काही अधिकारी आणि काही पोलीस अधिकारी शामिल असल्याची माहिती मिळालेली आहे,


भारतीय राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने रेशनिगची काळाबाजारी व तस्करी रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले परंतु भ्रष्ट प्रशासनामुळे कार्यवाही करण्यास नेहमी टाळाटाळ केली जात आहे म्हणूंन आज भारतीय राष्ट्रवादी पार्टी कडून सोशल ऍक्शन फोर्स तयार केली आहे यामार्फत रेशन ची काळाबाजारी,तस्करी रोखण्यासाठी शासन ,प्रशासनाला सहयोग आंदोलन करण्याचे ठरविले असून यासाठी खालील प्रमाणे पक्षाचे पदाधिकारी यांची सात सदस्य कमिटी ची निवड करत आहोत

1) कलिम सिद्धकी

2) मनीष दाभाडे

3)अजित संचेती

4)उमेश पाटील

5)देवा वाघमारे

6)साजिद पठाण

7)संतोष शिंदे 

डॉ भगवानभाई दांठिया राष्ट्रीय महासचिव राष्ट्रीय प्रभारी, यांनी पत्रक द्वारे प्रसिद्ध केले आहेत व पत्रक मध्ये म्हणाले आहेत की या किमिटी ने  शासनाच्या सहकार्यने गोरगरिबांच्या हक्काच्या धान्याची होत असलेली काळाबाजार,तस्करी रोखून राशन माफिया यांच्यावर कार्यवाही करावी....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या