💥समता,स्वातंत्र,बंधुत्व न्यायावर आधारीत संविधान हा देशाचा आत्मा....!


💥भारतीय जनतेला स्वत:च्या व राष्ट्राचा विकास करण्याच्या दृष्टिने मोठा कालखंड मिळाला💥

✍️फुलचंद भगत

वाशिम:-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 नोव्हेंबर 1949 ला संविधान समितीसमोर अखेरचे भाषण केले होते. त्यात ते म्हणाले होते की, संविधान कितीही चांगले असले, पण ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते प्रामाणिक असतील तरच ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही असे मनोगत 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीयांनी भारताच्या संविधानाला अंगिकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करुन घेतले. या घटनेला जवळपास 71 वर्षाचा कालावधी झालेला आहे. भारतीय जनतेला स्वत:च्या व राष्ट्राचा विकास करण्याच्या दृष्टिने मोठा कालखंड मिळालेला आहे. 


               या देशात अनेक धर्म आहे, हजारो जाती आहे, दर 14 - 14 मैलावर भाषा बदलणार्‍या हजारो भाषा आहेत मात्र या देशाचा धर्म समता, स्वातंत्र, बंधुत्व न्यायावर आधारीत संविधान हा देशाचा आत्मा आहे असे प्रतिपादन पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख विलास राऊत यांनी दिनांक 26-11-2021 रोजी संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कारंजा (लाड) येथे आयोजित कार्यक्रमामध्ये व्यक्त केले.

संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाला प्रगत मित्र मंडळाचे विजय गागरे, सामाजिक कार्यकर्ते चांदभाई मुन्नीवाले, बाबाराव डोंगरदिवे, विनायक वरघट, दादाराव डोंगरदिवे, विष्णू ढोके, मोसिनोद्दीनभाई, संदेश तायडे यंाच्या प्रमुख उपस्थितीत सपन्न झालेल्या या नेत्रदिपक संविधान दिनाच्या कार्यक्रमास सर्वप्रथम उपस्थितांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बुध्दवंदना घेवून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले व संविधानानुसार आचरण करुन त्याचा प्रचार व प्रसार करण्याची शपथ उपस्थितांनी घेतली. त्यानंतर मार्गर्शन करतांना समाजसेवक विष्णु ढोके यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, गरीब श्रीमंतांसह सर्व जातीधर्मांना जोडण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. जगातील सर्वोत्कृष्ठ संविधान दिले. ते या देशावर उपकार आहे. हे  उपकार जर कोणी नाकारत  सेल तर त्याला मी देशभक्त समजत नाही. सूर्याची, चंद्राची, पावसाची, हवेची, उजेडाची जात सांगा मला, सांगा..! त्यांची जात माहित नाही, मात्र या देशात जातीचा बागुलबुवा निर्माण करणारे लोक देशाला तोडण्याचं काम करतात असे लोक देशभक्त होवू शकत नाही. असे सांगुन  पुढे म्हणाले की, खरं पाहता, संविधान दिनाचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे होता, परंतु कोरोणाचे संकट अद्यापर्यंत टळलेले नाही. आपल्या हजारो अनुयायांनी इच्छा असतांना सुध्दा त्यांना या समारंभाला बोलावणे व येणे शक्य झाले नाही. सरकारनी कोरोणा बचावार्थ ज्या काही सूचना दिल्यात त्याचप्रमाणे त्या सूचनांचे पालन करुन आपण वागले पाहिजे, कारण की, कायदा हा कोणी केला ? बाबासाहेबांनी... त्याच कायद्यानुरुप, संविधानानुसार सरकारनी नियम दिले. त्याचे आपण पालन करुनच हा संविधान दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे.याप्रसंगी विजय गागरे, समाजसेवक चाँदभाई मुन्नीवाले यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, आपण कोणत्या जातीचे, धर्माचे आहे हे बाजुला ठेवा, सर्वात पहिले आपण भारतीय आहोत आणि शेवटपर्यंत भारतीयच असेल अशी जाणीव ठेवून संविधानानुसार देशहिताची वाटचाल करावी असे आवाहन केले. व उपस्थितीतांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय गागरे यांनी केल, संचालन तालुका अध्यक्ष विलास राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन चाँदभाई मुन्नीवाले यांनी केले. कार्यक्रमास कार्यक्रमाला बाळकृष्ण मनवर, प्रदीप मनवर, रवि गजभिये, प्रशांत चिरडे, अशोक वानखडे, रुपेश वाकोडे, दिनेश आगासे, मंगेश आगासे, गोपाल सोनुलकर, प्रल्हाद शाहाकार, रवि पंजवाणी, कनिराम राठोड, विजय नागदेव, वासुदेव चव्हाण, बबन लिंघाटे यांच्यासह भिमसैनिक, उपासक, उपासिका, पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या