💥चिखलीतील आनंद इलेक्ट्रॉनिकवर सशस्त्र दरोडा ; दुकान मालक कमलेशभाऊ पोपट यांची हत्या.....!


💥व्यापारी वर्गासह नागरिकामध्ये या घटनेने मोठी घबराट निर्माण झाली आहे💥

✍️ मोहन चौकेकर

चिखली  :- चिखली शहरातील जयस्तंभ चौकात मुख्य रस्त्यावर असलेल्या आनंद इलेक्ट्रॉनिक या दुकानात  दि. 16 नोव्हेंबरला रात्री  सव्वा दहा वाजेच्या सुमारास  सशस्त्र दरोडा पडला दोन दरोडेखोरांनी केलेल्या हल्यात दुकानाचे मालक  कमलेशभाऊ पोपट हत्या झाली  आहे.या घटनेमुळे संपूर्ण चिखली शहरात जोरदार खळबळ उडाली आहे व चिखली शहराच्या व्यापारी वर्गासह नागरिकामध्ये या घटनेने मोठी घबराट निर्माण झाली आहे.  


     
                                                   या घटनेची सविस्तर माहिती अशी की आनंद इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे मालक यांनी रात्री 9:45 वाजता त्यांच्या दुकानाचे मेन शटर बंद केले व बाजुचे छोटे शटर उघडे ठेवले  यावेळी एका दुचाकीवरून तीन दरोडेखोर दुकानासमोर आले त्यामधील दोन  दरोडेखोर दुकानात सशस्त्र घुसले एका दरोडेखोरांजवळ बंदुक होती. ती बंदुक त्या दरोडेखोरांने दुकानाचे मालक कमलेशभाऊ पोपट यांच्यावर रोखली यावेळी कमलेशभाऊ पोपट व दरोडेखोरा यांच्यामध्ये बरीच झटापट झाली. कमलेशभाऊ घाबरून शटरकडे पळत असताना दरोडेखोरांनी त्यांना  पकडले एका दरोडेखोराने कमलेशभाऊ पोपट यांचा गळा आवळून त्यांना रोखुन धरले  तर दुसऱ्या दरोडेखोरांने त्यांच्यावर  सपासप  तलवारीने अनेकवेळा वार केले तलवार त्यांच्या पोटात देखील खुपसली तलवारीने केलेल्या या  हल्यात ते जबर जख्मी होऊन खाली कोसळले. त्यानंतरही जाताना दरोडेखोरांनी  तलवारीने पुन्हा त्यांच्या तोंडावर सपासप वार केले. त्यामुळे  ते आणखी  गंभीर झाले. त्यानंतर  ते दोन्ही दरोडेखोर दुकानातील रोख रक्कम घेऊन फरार झाले. जखमी अवस्थेत देखील कमलेशभाऊ पुन्हा पोपट यांनी त्यांच्या मुलाला फोन केला परंतु  तो कामात असल्याने त्याच्याशी त्यांचा संपर्क झाला नाही.परंतु  त्याचवेळी रस्त्याने जाणाऱ्या त्यांच्या ओळखीच्या मुलाने त्यांना जखमी अवस्थेत पाहीले व त्याने कमलेशभाऊ पोपट यांच्या मोबाईलवरुन  मुलाला फोन केला यावेळी मात्र त्यांच्या मुलाने फोन उचलला त्याला ही घटना सांगितली व ताबडतोब येन्यास सांगण्यात आले.  मुलगा  तेथे आल्यावर कमलेशभाऊ पोपट यांना  जखमी अवस्थेत  चिखलीतील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.पुढील तपास पोलीस करीत आहे. रात्री तीन वाजता जालना येथुन श्वानपथक आले होते. परंतु दरोडेखोरांनी काही पुरावे मागे न ठेवल्यामुळे हे श्वानपथक वापस गेले. कमलेशभाऊ पोपट , अनिल भाऊ पोपट यांच्या सह संपूर्ण  पोपट परीवार   चिखली शहरात व चिखली तालुक्यात अतिशय धार्मिक व दानशूर म्हणुन ओळखल्या जातो.     धार्मिक व सामाजिक कार्यात  कमलेशभाऊ पोपट यांचा सक्रिय सहभाग असायचा.  कमलेशभाऊ पोपट  चिखली शहरातील अनेक गरजु व गरीब लोकांना देखील योग्य ती व आर्थिक मदत करत होते. चिखली  शहरासह तालुक्यातील अनेक मंदिरांमध्ये कमलेशभाऊ पोपट यांनी  सीसीटीव्ही कॅमेरे, लाउसपीकर , सांउन्ड सिस्टीम आदी दान स्वरुपात दिली होती. एवढेंच नव्हे तर  मंदिरासह विविध ठिकाणी होणाऱ्या भंडाऱ्यामध्ये ते दान देत असत.   कमलेशभाऊ पोपट यांची हत्या होण्याच्या दोन तास अगोदर त्यांनी कोलारा येथील यात्रेनिमित्त होणाऱ्या भंडाऱ्याकरीता  तेलाचा डबा दिला होता.  त्याचप्रमाणे कमलेशभाऊ पोपट रोज नित्यनेमाने रोज गाय व कुत्र्याला काही ना काही खाऊ घालत होते व त्यांना पाणी पाजत होते. त्याचप्रमाणे कमलेशभाऊ यांनी आज देखील  त्यांच्या हत्येच्या एक तास अगोदर गाईला व कुत्र्याला खाऊ घातले होते व त्यांना पाणी पाजले होते. अशारीतीने कमलेशभाऊ पोपट त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत दानधर्म व धार्मिक काम व पुण्यकर्म करतच होते. कमलेशभाऊ पोपट यांच्या हत्येने त्यांच्या मित्रमंडळी , नातेवाईकासह संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली आहे .  कमलेशभाऊ पोपट यांच्या हत्येने चिखली शहरातील व्यापारी , व्यावसायिक वर्गासह नागरिकामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. कमलेशभाऊ पोपट यांच्या हत्येच्या निषेधार्थ व कमलेशभाऊ पोपट यांना श्रद्धांजली म्हणून चिखली शहरातील सर्व दुकाने दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात यावीत असे आवाहन डीपीरोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राकेश चोपडा यांनी केले आहे....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या