💥पाथरी शहर अत्यावश्यक सेवेसह कडकडीत बंद ; दंगल नियंत्रण तुकडी तैनात...!


💥आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला तडीपार करण्याची मागणी💥

पाथरी:-आ बाबाजानी दुर्रानी यांना झालेल्या मारहाणी प्रकरणा नंतर पाथरीत व्यापारी महासंघाने तहसिलदारांना निवेदन देऊन संबंधित गुंडाला तडीपार करण्या साठी निवेदन देऊन बंदचा इशारा दिला होता. 

रविवारी पाथरी शहरात व्यापारी महासंघाची बैठक होऊन सोमवार पासून पेट्रोल,डिझेल सह भाजीपाला आणि किराणा या अत्यावश्यक सेवे सह संपुर्ण पाथरी शहर बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. सोमवारी सकाळ पासूनच चहाच्या टपरी पासुन मोठमोठे व्यापारी या बेमुदत बंद मध्ये सहभागी झाले होते. शहरात पाणी मिळणे ही मुश्कील झाले होते. व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी संबंधीताला तात्काळ तडीपार करा अशी मागणी सोमवारी आ बाबाजानी दुर्रानी यांच्या नेतृत्वाद आयजी कडे व्यापारी महासंघाने केली. दरम्यान पाथरीत शांतता कायम राहाण्या साठी पाथरी सह मानवत चे एक अधिकारी आणि दंगल नियंत्रक पथक तैनात होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या