💥पाथरी तालुक्यातील दोन कुस्तिविरांची महाराष्ट्र केसरी स्पर्धे साठी निवड...!


💥निवड झालेले कुस्तिवीर कोल्हापुर येथील तालमीत कुस्तीचे घडे घेत आहेत💥

टकिरण घुंबरे पाटील

पाथरी:-तालुक्यातील डाकूपिंप्री येथील दोन कुस्तीविरांची बालेवाडी पुणे येथे होणा-या महाराष्ट्र केसरी स्पर्धे साठी निवड झाली. ते कोल्हापुर येथील तालमीत कुस्तीचे घडे घेत आहेत.

डाकू पिंप्री येथील प्रगत शेतकरी उद्धवराव सोनवने यांचे चिरंजिव महेश सोनवने आणि याच गावचे माजी सरपंच आश्रोबा गिते यांचे चिरंजिव जयजित गिते या दोन कुस्तीविरांची पुणे येथे होणा-या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शुक्रवार १९ नोव्हेंबर रोजी या दोन्ही मल्लाचा सत्कार माजलगावचे माजी आमदार तथा योगेश्वरी शुगर्स चे चेअरमन  आर टी देशमुख जीजा यांनी करत या दोघांना स्पर्धे साठी शुभेच्छा देत प्रत्येकी अकरा हजारांची मदत योगेश्वरी शुगर्स कडून दिली.या वेळी  बोलतांना चेअरमन देशमुख म्हणाले की  शेतक-यांची मुले महाराष्ट्र केसरी स्पर्धे साठी निवडले जातात ही पाथरी तालुक्या साठी आणि जिल्ह्या साठी कौतुकास्पद असेच अभिमानास्पद बाब आहे. कुस्ती ही परंपरागत आहे या दोन्ही भुमीपूत्रानी त्याला उजाळा दिला आहे.या दोघांचे ही करावे तेवढे कौतूक कमीच असल्याचे सांगत आपण ही स्पर्धा नक्की जिंकाल असा विश्वास व्यक्त केला. या वेळी योगेश्वरी शुगर्सचे संचालक डॉ अभिजित भैय्या आर देशमुख,कार्यालय प्रमुख राजकुमारसिंह तौर,उद्धवराव सोनवने,मंगेश सोनवने,महादेव सोनवने तसेच उस बागायतदार आणि तोडणी ठेकेदार यांची उपस्थिती होती. या नंतर कार्यालया समोरील ध्वज परिसरात चेअरमन आर टी देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कल्याणराव फपाळ यांनी केले होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या