💥बिड जिल्ह्यातील गेवराईतील रिक्षाचालकांचा अनोखा झोल ; नऊ रिक्षांना एकाच क्रमांकाची नंबर प्लेट...!


💥हिगोंली जिल्ह्यातील आखाडा बळापूर परिसरात एकाच क्रमांकाच्या दोन दुचाकी💥

✍️ मोहन चौकेकर

बिड:-बनावट नंबर प्लेट तयार करून आरटीओचा महसूल बुडवण्याचा प्रकारात सध्या वाढ होताना दिसत आहे. हिगोंली जिल्ह्यातील आखाडा बळापूर परिसरात एकाच क्रमांकाच्या दोन दुचाकी धावत असल्याची माहिती समोर आली होती.

याप्रकरणी पोलिसांनी एका जणाविरोधात गुन्हा दाखल केला होता. ही घटना ताजी असताना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील घटनेनं सर्वांच लक्ष वेधून घेतलंय. या परिसरात एकाच नंबरच्या एक, दोन नव्हेतर चक्क नऊ रिक्षा रस्त्यावर धावत असल्याची माहिती मिळत आहे.याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी कारवाई केली असून नऊ रिक्षा जप्त केल्या आहेत.तसेच या नंबरच्या आणखी रिक्षा असण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

संबंधित रिक्षाचालकानं रिक्षा विकत घेतल्यानंतर सुरुवातीला तात्पुरती म्हणजे टेम्पररी पासिंग केली. मात्र, त्यानंतर पर्मनंट पासिंग करायला रिक्षाचालक आरटीओकडे गेलेच नाहीत, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीय.एखादं वाहन खरेदी केल्यानंतर पर्मनंट पासिंग करण्यासाठी 15 दिवसाचा कालावधी लागतो. मात्र, या प्रकरणातील रिक्षा चालकांनी मागील चार-पाच वर्षांपासून आपल्या रिक्षाची पासिंग करून घेतली नाही. हेच रिक्षाचालक आता कधी आरटीओ साहेब नव्हते. तसेच कोरोनाचा काळ होता म्हणून पर्मनंट पासिंग करता आली नाही, अशी जुजबी कारणे देत आहेत.

या आठही रिक्षा गेवराई पोलीस ठाण्यात लावण्यात आल्या आहेत. या एकाच नंबरच्या आठही रिक्षामालक व चालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये केवळ हे रिक्षाचालक दोषी आहेत का? एका शहरांमध्ये एकाच क्रमांकाच्या इतक्या रिक्षा फिरत असताना, बीड जिल्ह्यातील आरटीओ पोलीस काय करत होते? असा प्रश्न उपस्थित होत आहे....

 ✍️  मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या