💥विरशैव लिंगायत प्रतिष्ठाण,महाराष्ट्र वतीने श्री क्षेत्र कपिलधार येथे महापुजा....!


💥वीरशैव लिंगायत प्रतिष्ठाण,महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष डॉ. मदन लांडगे यांच्या हस्ते महापुजा संपन्न💥

परभणी - नोव्हेंबर रोजी बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र कपिलधार येथे कार्तिक पौर्णिमानिमित्ताने वीरशैव लिंगायत प्रतिष्ठाण,महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष डॉ. मदन लांडगे यांच्या हस्ते महापुजा करण्यात आली.

या महापुजेला समाजभूषण रामदास पाटील,प.पु. ष.ब्र.108 काशीनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर,प.पु.ष.ब्र.108डिगांबर शिवाचार्य महाराज वसमत , परभणीतील खाजेबुवा देवस्थान दिंडीतील भाविक व वीरशैव लिंगायत प्रतिष्ठाण चे सो.मि.प्र.सोमेश्वर लाहोरकर,उमाकांत घाटीवाले, शि. भ. प. विरभ्रद स्वामी ,जिल्हा संघटक गोविंद कामटे,शिवचरण बीडकर, शिवा पाटील, सोमनाथ लांडगे, संजय फुलझळके, विठ्ठल दामोदर, दिंडीतील महिला मंडळ वीरशैव लिंगायत बाधव आदी पदधिकारी उपस्थित होते

तसेच परभणी येथील करडगाव येथुन निघालेल्या खाजेबुवा देवस्थान दिंडीत खा.संजय जाधव यांनी गुरुराज माऊली मन्मथ माऊली अशा गजरात मन्मथ स्वामी विषयी असलेली श्रद्धा व्यक्त करत पाउलचाल खेळली व कोरोना सारखी महामारी जगातुन हद्दपार होवो व सर्व पूर्वीसारखे सुरळीत होवो अशी अपेक्षा व्यक्त केली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या