💥अजीम नवाज राही व डॉ.आनंद निकाळजेंचा सन्मान हा संवेदनांचा सोहळा -- ना.राजेंद्र शिंगणे


💥शब्ददौलत राही-भाईजी ; संस्मरणीय ठरलेला सन्मान सोहळा💥

  ✍️ राजेंद्र काळे

अजीम नवाज राही मृत्यूच्या दारातून बाहेर आले, अन् त्यांना मृत्यूच्या जबड्यातून आणणारे माणसातले देव ठरले ते डॉ.आनंद निकाळजे.. या दोघांचा ‘आम्ही शब्दप्रेमी’ मंडळींनी आयोजीत केलेला हा सन्मान सोहळा सोसलेल्या वेदनांप्रती संवेदना व्यक्त करणारा अविस्मरणीय सोहळा असल्याचे प्रतिपादन ना. डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केले. तर सहकारात बुलडाणा अर्बनने जशी भरारी घेतली, तशी भरारी साहित्य प्रांतात अजीम नवाज राही यांनी घेतली असून ते खऱ्या अर्थाने ‘शब्ददौलत’ठरले असल्याच्या भावना राधेश्याम चांडक यांनी व्यक्त केल्यात.

कार्यक्रमाच्या इतिहासात अनोखा ठरावा, असा भावसोहळा सोमवार १५ नोव्हेंबरच्या सायंकाळी बुलडाणेकरांनी प्रत्यक्ष तर महाराष्ट्रातील हजारो मराठी रसिकांनी यु-ट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन अनुभवला, तो म्हणजे कोरोना काळात मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आलेले अजमी नवाज राही व यासाठी त्यांच्यावर शर्थीचे प्रयत्न करणारे एमजीएम.हॉस्पिटल औरंगाबादच्या कोरोना विभागाचे प्रमुख डॉ. आनंद निकाळजे यांचा सन्मान सोहळा. भाईजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते ‘मृत्यूंजयी राही’ व ‘कोरोनायोध्दा डॉ.निकाळजे’ यांना स्मृतीचिन्ह देवून सन्मानीत करण्यात आले. यावेळी मंचावर जि.प.अध्यक्षा सौ.मनिषताई पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड व ‘शब्दप्रेमी’ संकल्पक राजेंद्र काळे प्रामुख्याने उपस्थित होते.

दगडाला शेंदूर फासून आपण त्याची पुजा करणारी माणसे आहोत. दगडात ही आपणाला देव दिसतो, मात्र खरे देव आपणाला कोरोना काळात सापडले आहेत. ते म्हणजे डॉक्टरातील देव. डॉक्टरांनी कोरोना काळात स्वताच्या जिवांची पर्वा न करता सेवा उपलब्ध करुन दिली. म्हणून हे माणसातील देव आपण शोधले पाहिजे. चांगले काम करणारी मंडळी म्हणजेच देव. या देवांनीच आपल्या लाडक्या साहित्यीक अजीम नवाज राही यांना परत आणले. असे प्रतिपादन जिल्हयाचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केले. _

_तर अध्यक्षीय मनोगतात राधेश्याम चांडक यांनी आपल्यात व राहीत मॅट्रीक पास व नापास एवढे साम्य असून, आम्ही दोघेही मात्र आमच्या-आमच्या क्षेत्रात चांगलं काम करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगत असतांना.. राहींच्या वांड्ःमय सहवासात नैराश्य दूर करण्याचं सामथ्र्य असल्याचे सांगितले. _

मोठे साहेब स्व.भास्कररावजी शिंगणेंपासून डॉ. राजेंद्र शिंगणेंपर्यंत माझा भक्ती व निष्ठेचा प्रवास राहीला असून, या आजारात लहान्या साहेबांनी जी अपार मेहनत घेतली त्याचा भावपूर्ण उल्लेख करतांना अजीम नवाज राही यांनी त्यांचा जिवनपटच ओघवत्या शैलीतून मांडला. या भटवंâतीला भाईजींनी जी साथ दिली त्याचाही गौरवपूर्ण उल्लेख करतांना त्यांनी कुठलीही सत्ताकेंद्र जवळ नसतांना ‘आम्ही शब्दप्रेमी’च्या माध्यमातून हा जो सन्मान सोहळा आयोजीत केला, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन सर्वांचाच नामोल्लेख गौरवाने केला._

_अजीम नवाज राही हे ‘वाड्ःमयीन प्राणवायू’च आहे, असे डॉ.आनंद निकाळजे यांनी सांगून कोरोनात त्यांच्यावर उपचार करतांना आलेले अनुभव विषद करतांना.. या काळात अशा सोहळ्यांची गरज असल्याचे सांगून सर्वांनी लस घेवून आरोग्य विमा काढण्याचे कळकळीचे आवाहन केले.

प्रकाशफुलांच्या उधळणीत अजीम नवाज राही व डॉ.आनंद निकाळजे सभागृहात येताच, टाळ्यांच्या कडकडाटात या दोन सत्कारमुर्तींचे हटके स्वागत केले. कार्तिकी एकादशी असल्याने तत्पूर्वीच शाहीर करणसिंग राजपूत व संचाने विठ्ठलगितांनी वातावरण भक्तीमय केले असतांनाच, महाराष्ट्र गिताने सोहळ्यात आवेश संचारला. जगभरात कोरोनाकाळात मृत्यूमुखी पडलेल्यांसह महाराष्ट्रभुषण बाबासाहेब पुरंदरे यांना स्तब्ध राहून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. 

मान्यवरांच्या सत्कारानंतर ‘आम्ही शब्दप्रेमी’च्या माध्यमातमून आयोजीत या सन्मान सोहळ्यामागची भुमिका प्रास्ताविकातून राजेंद्र काळे यांनी विषद केली. त्यानंतर सुनिल बोर्डे यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘शब्दयोध्दा’ हा माहितीपट विशाल एलई-डी.स्क्रीनवर दाखविण्यात आला, तेव्हा ना.शिंगणेंसह सभागृहाचे डोळे पाणावले.. हा ओलावा सुत्रसंचालक सिध्देश्वर पवार यांनी अलगद टिपून राहींच्या आजारपणात सदैव सोबत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.नाझेर काझी यांना मनोगतासाठी बोलावले. चिखलीच्या कोविड सेंटरपासून ते औरंगाबाद एमजीएम.पर्यंत राही यांच्या जीवन-मरणाच्या सिमेवरील प्रवास हा अनेक प्रसंगांतून त्यांनी विषद केला. ‘बारोमासकार’ सदानंद देशुमख यांनी वेदना मांडणारे साहित्य राही यांनी लिहिले असून त्यांच्या परत येण्याचा आनंद साहित्यीकांना प्रामुख्याने झाला असल्याचे त्यांनी सांगून त्यांची उभारी देणारी कविता ऐकवली.

ज्या राही साहेबांच्या कविता शिकत-शिकत आम्ही लहानचे मोठे झालो, ते राही साहेब आजारातून बाहेर आल्याचा आनंद शब्दातून व्यक्त होवू शकत नसल्याचे जि.प.अध्यक्षा सौ.मनिषाताई पवार यांनी सांगून धर्म व जातीपलिकडचे हे व्यक्तीमत्व असल्याचे त्या म्हणाल्या. कोरोना आजरातून राही साहेबांचे बाहेर पडणे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले होते, या भावना रविकांत तुपकर यांनी व्यक्त करुन त्यांचा मुलगा साहिलने त्यांच्यासाठी जी मेहनत घेतली त्याचाही विशेष उल्लेख करुन आता पुनर्जन्म झाल्यामुळे राही साहेबांनी मित्रांचेही थोडेफार ऐकावे.. असा सल्ला दिला. 

यावेळी मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल पत्रकार राजेंद्र काळे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.निकाळजे यांच्यासोबत आलेले डॉ.रोहन गंडरे व प्रदिप तौर यांचाही मान्यवरांनी सत्कार केला. यावेळी अजीम राही यांना गोरेगाव उत्कर्ष संस्थेच्या वतीने २५ हजारांचा व साखरखेर्डा ग्रामपंचायतच्या वतीने २१ हजाराचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी ग्रामविस्तार अधिकारी अशोक काळे व सौ.कविता काळे यांनी तथागत गौतम बुध्दांची मुर्ती भेट देवून डॉ. आनंद निकाळजे यांचा भावनिक सत्कार केला. 

सुत्रसंचलन सिध्देश्वर पवार, मानपत्रवाचन प्रा.गोविंद गायकी तर आभार प्रदर्शन अरुण जैन यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत समाधान सावळे पाटील, जि.प.सभापती रियाजखाँ पठाण, गजानन वायाळ, संजय पांचाळ, अरुण जैन, सिध्दार्थ आराख, नितीन शिरसाट, संजय जाधव, वसीम शेख, चंद्रकांत बर्दे, सुधीर चेके पाटील, अमर राऊत, सै.रफीक, समाधान म्हस्के, साखरखेड्र्याचे सरपंच दाऊद सेठ, समता परिषदेचे दत्ता खरात, सौ.गायत्री काळे व सौ.कविता काळे यांनी केले. केक कापून या सोहळ्याची सांगता झाली.....

 ✍️ राजेंद्र काळे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या