💥दुर्देवी घटना ; रिसोड येथील बिछायात केंद्राच्या गोडाऊनला भीषण आग ; एक ठार....!


💥या सिलेंडर स्फोटामध्ये आशिष राऊत हा 16 वर्षीय मुलगा जागीच ठार तर इतर तिघे जण गंभीर जखमी💥 

✍️फुलचंद भगत

वाशिम:-रिसोड शहरातील सराफ लाईन भागात असलेल्या मंगलम बिछायत केंद्राच्या गोदामा ला रात्री 10:30 च्या सुमारास आग लागली . या आगीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला . या सिलेंडर स्फोटमध्ये आशिष राऊत हा 16 वर्षीय मुलगा जागीच ठार तर इतर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. 

घटनेतील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे . या आगीत गोदाम संपूर्ण जळून खाक झाला आहेत. या आगीमुळे लाखोंचं नुकसान झालं आहे. तसेच स्फोटात गंभीर जखमींना वाशिम येथे पाठविण्यात आले असून,आग विझविण्यासाठी रिसोड अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. नेमकी आग कशी लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग लागल्यचे लक्षात येताच नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीवर नियंत्रण मिळवता न आल्याने अग्निशमनदलाला घटनास्थळी बोलवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांना अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. पोलीस देखील घटनास्थळी हजर झाले होते. या आगीत गोडाऊनमधील लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या