💥पाणीपुरवठा करणाऱ्या चाऱ्यांची दुरुस्ती सरकारी खर्चाने करा - सखाराम बोबडे पडेगावकर


💥बोबडे यांनी सिंचन शाखा क्र 2 गंगाखेड येथील कार्यालयाकडे आज बुधवारी लेखी निवेदनाद्वारे केली मागणी💥

गंगाखेड/ प्रतिनिधी

गंगाखेड तालुक्यातील टाकळवाडी लघु प्रकल्पांतर्गत  गुंजेगाव शिवारात पाणीपुरवठा करणाऱ्या चाऱ्याची दुरुस्ती सरकारी खर्चाने करत शेतकऱ्यांना वेळेवर पिकासाठी पाणी सोडावे अशी मागणी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांनी सिंचन शाखा क्र 2 गंगाखेड येथील कार्यालयाकडे बुधवारी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

सिंचन शाखा क्रमांक 2 येथे निवेदन दिले  देण्यात आहे. गुंजेगाव शिवारात पाणीपुरवठा करणाऱ्या चाऱ्या खराब झाल्या आहेत. रब्बी हंगाम सुरू झाला असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना पिकासाठी पाण्याची आवश्यकता आहे. पण आज पाहतो पाणी सोडलेली नाही. पाण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरून या कार्यालयाचे अधिकारी या चारयांची दुरूस्ती मात्र आजपर्यंत शेतकऱ्यांना करायला लावत असत. जी गोष्ट सरकारी खर्चाने व्हायला पाहिजे ती न केल्याने शेतकऱ्यांना भुर्दंड सहन करावा लागतो. पण या वर्षीचा हंगाम सुरू करण्यापूर्वी या चारयांची दुरुस्ती सरकारी खर्चाने करून शेतकऱ्यांना वेळेवर पाणी पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली. या चारीवर झाडेझुडपे वाढली आहेत. दुरुस्ती न करता पाणी सोडल्यास बाजूच्या शेत जमिनी पाण्यामुळे वाहून जाऊ शकतात. गुंजेगाव शिवारातून चारी गेली. वाटेत एक ओढा वाहतो.ओड्यावर फुल बांद्ला नसल्याने शेतकऱ्यांना इकडून तिकडे आपली जनावरे नेणे ,बी-बियाणे खते घेऊन जाणे यासाठी अडचण होत आहे .तरी हा पूल बांधण्यात यावा अशी मागणी केली आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या आठ दिवसात याच ओड्यात बसून आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर , जयदेव मिसे, शिवाजी महाराज बोबडे, जयवंत कुंडगीर, दत्तात्रय बिडगर , संतोष दहिफळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या